Literature recalls the legacy of social service | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

साहित्यिकांनी जपला समाजसेवेचा वारसा

साहित्यिकांनी जपला समाजसेवेचा वारसा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : साहित्यसंपदाच्या नुकत्याच पार पडलेल्या दुसर्‍या कोल्हापूर साहित्य संमेलनाची धुंदी उतरते न उतरते तोच कोल्हापूर मधील पूर परिस्थितीच्या बातम्या बाहेर येऊ लागल्या. तिकडची भयावह पूरपरिस्थिती अनेकांच्या मनाचा थरकाप उडवू लागली. साहित्य म्हणजे समाजाचा आरसा असे समजले जाते. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी साहित्यिक व्यथित नाही झाला तर नवलच ! अशावेळी शब्दच मदतीला धावून आले. साहित्यसंपदा या साहित्य आणि समाज क्षेत्राशी निगडित काम करणाऱ्या संस्थेतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले. समाजातील विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद या आव्हानास लाभला. एक उत्कृष्ट नियोजन आणि शिस्तबद्ध उपक्रम संस्थेतर्फे राबिवण्यात आला.

अलिबाग पेझारी पेण पनवेल या रायगड मधील विविध विभागातून तसेच मुंबई आणि उपनगरातून मोठ्या प्रमाणावर मदत गोळा करण्यात आली. विशेष म्हणजे साहित्यसंपदा संस्थेच्या या आव्हानाला सोलापूर पुणे नांदेड या विभागातून प्रतिसाद मिळून मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांसाठी मदत मिळाली. या उपक्रमासाठी विविध भागात संस्थेच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली होती. त्या अंतर्गत अलिबाग येथील लायन्स क्लब प्रेसिडेंट रमेश धनावडे यांनी मार्गदर्शकाची भूमिका चोख पार पाडली. आपत्कालीन समिती मधील स्वयंसेवक म्हणून रायगड विभागातून दिलीप मोकल, पेझारी व पोयनाड मधून सामाजिक कार्यकर्त्या जीविता पाटील, पनवेल मधून रवींद्र सोनावणे आणि संदीप बोडके, नवी मुंबई येथून अमित घरत आणि प्रतीक धनावडे, मानखुर्द येथून लालसिंग वैराट, ठाणे येथून सुरेंद्र बालंखे, कल्याण मधील श्रीकांत पेटकर व किरण जोगळेकर, भांडुप येथील वैशाली आणि संजय कदम हे दांपत्य, गोरेगाव येथील विवेक उतेकर व मानसी नेवगी, घाटकोपर येथील प्रणय कांबळे, सायन येथील चेतन कांबळे, काळाचौकी येथील प्रकाश ओहळे, गणपत पाबळे, अमित कांबळे, विजय निगडकर, गिरीष कारेकर, रवींद्र दांडकर, पुणे येथील अश्विनी वराळे आणि सचिन सवाई, सोलापूर येथील ऍड. कैलास नाईक आणि श्रुती कुलकर्णी, नांदेड येथून डॉ. शिवकुमार पवार आणि अंजली मुनेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली होती . दिलेल्या जवाबदाऱ्या आदींनी जवाबदाऱ्या लीलया पार पाडत कमी वेळात अवघ्या महाराष्ट्रातून मदत गोळा करण्यात अपार कष्ट घेतले. सदर आव्हानास समाजातील विविध संस्थांनी प्रतिसाद दिला त्यात स्नेहल शिंदे यांच्या राइजिंग स्टार, ओंकार पवार यांच्या स्वराज्य फौंडेशन या संस्थानी उल्लेखनीय मेहनत घेतली. कोणतेही सामाजिक कार्य पार पाडण्यासाठी महत्वाची गरज असते ती आर्थिक मदतीची हे हेरून डोंबिवली मधील शैलेश जोशी, संतोष सकपाळ, पार्ले येथील अपेक्षा बिडकर, सरिता जोशी यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक भार उचलला. बोरिवली येथील राजेश म्हात्रे यांनी देखील मोठ्या रकमेची औषधे मोफत उपलब्ध करून दिली. नवीन कपडे , प्लास्टिक बादल्या, गृहपयोगी वस्तू, खाद्य पदार्थ, औषधे या प्रकारच्या विविध वस्तू एकत्रित करून दोन ट्रक भरून सामान गोळा झाले खरे पण सर्व सामान गरजू व्यक्तींपर्यंत पोहचणे अत्यावश्यक होते त्यासाठी वैभव धनावडे ,गुरुदत्त वाकदेकर आणि राहुल तवटे या त्री सदस्यीय वितरण समितेने पुरग्रस्तांपर्यंत पोहचण्याचे विविध उपलब्ध मार्ग यांचे अवलोकन करून ओंकार पवार आणि प्रणय कांबळे यांच्या सहित कोल्हापूर कडे प्रस्थान केले.

कोल्हापूर येथे पोहचल्या नंतर काही स्थानिक समस्यांशी या समितीला तोंड द्यावे लागले पण घेतलेला वसा जिद्दीने पूर्ण करण्यासाठी रवाना झालेल्या सदस्यांनी कंबर कसली. सर्व प्रथम जमा झालेले सामान इस्लापूर येथे सामानाच्या स्वरूपानुसार वर्गीकरण करण्यात आले. त्यानुसार तांदूळ, गहू, बिस्किटे, तेल, सुका खाऊ अाणि विविध गृहउपयोगी वस्तू समप्रमाणात विविध पिशव्यांमध्ये भरुन वाटण्यासाठी हॅम्पर बनवण्यात आले. हे सर्व होत असतांना इस्लामपूर मधील शोएब शेख, तुषार शेळके आदी काही तरुणांनी हिरीहिरीने भाग घेत स्वतः पूरग्रस्त असून देखील आपला सहभाग नोंदवला. वर्गीत केलेले सर्व सामान वितरणासाठी कोल्हापूरमधील साहित्यसंपदा संस्थेतील मधील सारंग चव्हाण, स्मित शिवदास, स्वप्नाली ढोणुक्षे, उत्तम चोरडे यांनी मेहनत घेतली. हे सर्व होत असताना अतुल पाटील, युवराज पाटिल, रामदास धनवडे या स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी विशेष सहभाग नोंदवत ज्या भागात अजूनही मदत पोहचली नव्हती अश्या कोल्हापूर मधील विविध गावांची निवड करून हातोहाती मदत पोहचण्याचे काम चोख बजावले. फक्त कोल्हापूरच नव्हे तर साहित्यसंपदा संस्थेतील सोलापूर विभागातील सदस्यांकडून आलेली मदत ऍड . कैलास नाईक यांनी सांगली मध्ये वैभव चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघर पोहचवली. सदर उपक्रमाच्या नियोजनाची जवाबदारी मनोमय मीडिया यांनी पार पाडली.

टाकळी चंदूर, रुई चंदूर, हणमंत वाडी, शिंगणापूर, जरगनगर, बोरगाव, बनेवाडी, कुरुंदवाड, हेरवाड अश्या अनेक विविध पुरग्रस्त भागांत साहित्यसंपदा संस्थेचे कार्यकर्ते अविरत झटताना दिसत होते. साहित्यसेवा करीत असताना बाळगलेल्या सामाजिक जाणीवेबद्दल साहित्यसंपदा संस्थेतील सर्व साहित्यिकांचे समाजात कौतुक होत असून समाजासाठी खऱ्या अर्थाने झटणाऱ्या अश्या स्वरूपाच्या संस्थांची गरज समाजाला आधार भासत आहे असे मत सर्वत्र व्यक्त होताना दिसत आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts