Literary writers need knowledge of the change of literature - Madhu Mangesh Karnik | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

साहित्याच्या परीघ बदलाचे ज्ञान साहित्यिकांना हवे – मधु मंगेश कर्णिक

साहित्याच्या परीघ बदलाचे ज्ञान साहित्यिकांना हवे – मधु मंगेश कर्णिक

मुंबई (प्रतिनिधी) : ” कोकण साहित्याच्या दृष्टीने पुढारलेला आहे.कोकणातल्या कविंची कविता-कथा वेगळी असते; त्याला पर्यावरण आणि निसर्गाचा किनारा असतो.आता साहित्याचा परीघ बदलतोय त्याचं ज्ञान साहित्यिकांना हवं.गोष्ट ऐकायला आवडणे हे कथेचे सामर्थ्य आहे;याचं भानही कथाकारांना हवं.” असे उद्गार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण मराठी साहित्य परिषद, ग्रंथाली व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय,नायगाव यांच्या वतीने सुरेश खेडेकर यांच्या ‘डोहमृग ‘या कथासंग्रहाचे प्रकाशन करतांना मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर येथे काढले.या वेळी कोमसापच्या कार्याध्यक्षा नमिता कीर,ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर,प्रा. पंढरीनाथ रेडकर,अल्पना कशाळकर व एकनाथ आव्हाड यांनी ‘ डोहमृग ‘ कथासंग्रहावर विचार मांडले.तर ग्रंथसंग्रहालयाचे डॉ.कृष्णा नाईक यांनी कथेचे वाचन केले.याप्रसंगी कोमसाप मुंबई उपनगरचे अध्यक्ष शिवाजी गावडे व सूर्यकांत मालुसरे यांनी खेडेकर यांना शुभेच्छा दिल्या.या दिवशी कथाकार सुरेश खेडेकर यांचा ७५ वाढदिवस असल्याने त्यांच्या पत्नी समता खेडेकर आणि कुटुंबियांसह मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.या अनुषंगाने कवयित्री गौरी कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन आयोजित केले होते.त्यात ४० कविंनी विविधांगी कविता सादर केल्या.त्यांना चांगलीच दाद मिळाली.याचे सूत्रसंचालन मनोजन धुरंधर यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीच्या निवेदिका पूजा काळे यांनी केले.शेवटी कवी व निमंत्रितांना सुरेश खेडेकर यांनी दैनंदिनी भेट देऊन आभार मानले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts