Launch forex mobile app from MK Global | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

एमके ग्लोबलकडून फॉरेक्स मोबाईल अँँप लाँच

एमके ग्लोबलकडून फॉरेक्स मोबाईल अँँप लाँच

मुंबई१२ जून २०१९: आर्थिक सेवा देणारा आघाडीचा ग्रुप एमके ग्लोबल फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपले एमके एफएक्स (ईएमएफएक्स) हे पहिले फॉरेक्समोबाईल अॅप बाजारात लाँच केले. भारतातील लघु व मध्यम निर्यातदार आणि आयातदारांना थेट (रिअल-टाइम) परकीय चलनाच्या जोड्यांच्या किंमती उपलब्ध करून देऊन त्यांच्या व्यवहारांना बळकटी देण्याच्या उद्देशाने एमके एफएक्स हे अॅप बाजारात आणण्यात आले आहे.

सर्वांत गतीने आणि स्मार्ट पद्धतीने जागतिक फॉरेक्स बाजारांशी जोडले जाता यावे व फॉरेक्स मार्केटमधील किंमती रिअल टाइममध्ये बघता याव्यातयासाठी ईएमएफएक्स अॅप विकसित करण्यात आले आहे. आजच्या अतिवेगवानमॉडर्न आणि प्रचंड फिरस्ती असलेल्या जगात लोकांना चालता-चालता आपल्या बोटांच्या इशाऱ्यांवर माहिती हवी असते त्यासाठीच हे अॅप तयार केले आहे. या अॅपच्या विशेष वैशिष्ट्यांमुळे वापरकर्त्यांना ६०० चलनी जोड्यांच्या किंमती अभूतपूर्व क्षमतेने पाहता येतील. हे अॅप अँड्रॉइड प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल.

भारताच्या राष्ट्रीय वार्षिक सकल उत्पन्नामध्ये (जीडीपी) लघु व मध्यम उद्योगांचे योगदान ४५ टक्के आहे. त्यामुळे हे क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे मानले जाते. परदेशी व्यापार यशस्वी करण्यामध्ये महत्त्वाचा अडथळा असेल तर तो जागृतीचा अभाव आणि सातत्याने वर-खाली होणाऱ्या चलनाच्या किंमतींचा आहे. परकीय चलनांचे दर अत्यंत अस्थिर असल्याने उद्योगांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी चलनाचे हेजिंग करणे गरजेचे असते. लघु व मध्यम उद्योगांतील निर्यातदार आणि आयातदार यांच्यात असलेल्या खऱ्या क्षमतेचा उपयोग करुन घेणारे मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी या अॅपच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे.

लाँचवेळी एमके ग्लोबल फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश कचोलिया म्हणाले, ”एमके एफएक्स हे वापरकर्त्याला सहजपणे वापरता येणारे अॅप आहे. रिअल-टाइम परकीय चलनाच्या व्यवहारांच्या दरांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व एसएमई ग्राहकांना प्रभावीपणे पुढचे प्रकल्प राबवता यावेत यासाठी हे अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे आमच्या संस्थात्मक आणि एसएमई ग्राहकांच्या व्यवसायाची वृद्धी होणार आहे. एमकेमध्ये आम्ही आमच्या उत्पादनांमध्ये कालसुसंगत आणि योग्य संशोधन केलेल्या डिजिटल गोष्टींचा समावेश करण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याचा आमच्या सर्व स्टेकहोल्डरना फायदा होतो आणि ईएमएफएक्स हे या दिशेने टाकलेले आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

ईएमएफएक्स देशांतर्गत तसेच आंतराराष्ट्रीय फॉरेक्स मार्केटमधील रिअल-टाइम माहितीसह रिअल-टाइम बातम्याआर्थिक माहितीफोरेक्स कॅलक्युलेटर्सअद्ययावत चार्टस्,कस्टमाइज्ड अॅलर्टस् आणि विशेष एमके अहवाल व कॉल्सच्या सोबत पीएमएस या गोष्टी उपलब्ध करून देते. फॉरेक्स मार्केटमधील सर्वांत संवेदनशील माहिती म्हणजे रिअल-टाइम इंटरबँक ट्रेजरी रेट्स/कोट्स, जे नेहमी स्प्रेड्ससोबत दिले जातात आणि आता अॅपमध्ये ते आता स्प्रेडविरहित आणि थेट बँकेच्या ट्रेजरीतून दिले जातात. यामुळे फॉरेक्स-स्पॉटफ्युचर आणि फॉरवर्ड टुगेदर यांचे वेगळे कॉम्बिनेशन मिळते, जे देशांतर्गत फोरेक्सस्पॉट आणि फॉरवर्डस्, आंतरराष्ट्रीय फॉरेक्स आणि फॉरवर्ड तसेच बेंचमार्क इंडेक्ससह एनएसई करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज यांनाही सपोर्ट करते.

भारतातील परकीय चलनाचे मार्केट अतिशय वेगाने वाढत असल्याने इतर विकसित होणाऱ्या मार्केट अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय मार्केटमधील परताव्याची खरी किंमत अजूनही एफआयआयसाठी किफायतशीर आहे. सीसीआयएलनुसार२०१८ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१९ मध्ये फॉरेक्सचे एकूण प्रमाण २.६७ बिलियनअमेरिकी डॉलरवरून २७.९० बिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत गेले आहे. त्याचबरोबर भारताच्या एकूण व्यापारात (आयात + निर्यात) आर्थिक वर्ष २०१७च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१८ मध्ये वाढ झाली असूनती ७४७ बिलियन अमेरिकी डॉलरवरून ८३५ बिलियन अमेरिकी डॉलरपर्यंत गेली आहेम्हणजे १२ टक्क्यांची वाढ. त्यामुळेफॉरेन एक्स्चेंज मार्केटमधील न टाळता येणारी जोखीम हेज करण्याची गरज निर्माण झाली आहे.

एमके ग्लोबल फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड विषयीभारतातील मुंबईत मुख्यालय असलेली एमके ग्लोबल फायनॅन्शियल सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी एकात्मिक सिक्युरिटी फर्म असूनमोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देते ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट बँकिंगइन्स्टिट्युशनल ब्रोकिंग, खासगी मालमत्ता व्यवस्थापन आणि फायनॅन्शियल प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युशन यांचा समावेश होतो. कंपनीच्‍या इन्स्टिट्युशनल ब्रोकिंग विभागाच्या सेवा घेणारे ग्राहक जगभरातील सर्व महत्त्वाच्या भूभागांवर आहेत. तसेच कंपनीच्या संशोधनाला थॉम्सन रॉयटर्स, एशियामनीद वॉल स्ट्रीट जर्नल यासारख्या अनेक संस्थांकडून मान्यता मिळाली आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts