कोकण विभाग पत्रकार संघ, कोकणभूमी सामाजिक विकास संस्था यांच्या सह्योगाने एक लक्षवेधी उपक्रम

कोकण विभाग पत्रकार संघ, कोकणभूमी सामाजिक विकास संस्था यांच्या सह्योगाने एक लक्षवेधी उपक्रम

मुंबई (अश्विनी निवाते) : कोकण विभाग पत्रकार संघ, कोकणभूमी सामाजिक विकास संस्था यांच्या सह्योगाने शनिवार दि. ९ मार्च रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई या ठीकाणी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कोकण विभाग पत्रकार संघाचे संस्थापक मा.श्री संजय हंडोरे-पाटील साहेब, कोकण भूमी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष मा.श्री प्रकाश चांदीवडे साहेब ह्यूमन राईट सेल यूनिटचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. सुरेश सोलंकी साहेब व एकता मिशन स्माईल फाऊंडेशनच्या अध्यक्ष व ८ मार्च २०१९ च्या मुंबई महानगरपालिकेच्या पुरस्कर प्राप्त झालेल्या शबनम टोपीवाला मॅडम यांना रोजनीशी देऊन सन्मानित करण्यात आले. मानव, समाज, सामाजिक संस्था शाहीर वसंत भातडे साहेब यांनी विषयाचे प्रास्ताविक मांडताना सांगितले मानवाची उत्कांती, समूहात राहणार्‍या व्यक्तींमध्ये असणारी संबंधाची व्यवस्था म्हणजे समाज. परस्परांच्या प्रेरणा,भावना,हेतू,उद्दीष्टे,विचार प्रणाली आणि मूल्ये इ.आंतरिक घटकाचा प्रभाव एकमेकांच्या वर्तनावर पडतो त्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. विषम विचारांमुळे समाज बांधवांमध्ये वाद निर्माण होतात. सामाजिक एकीला बाधा आणणारी प्रवृत्ती निर्माण होते काही विशिष्ट हेतू ठेवून कार्य करणारी व्यक्ती घटना बाह्य कामे करतात त्यातून सामाजिक विकासावर परिणाम होतो. को.वि.प.सं संस्थापक समाजसेवेचे गांभीर्य आणि पत्रकारिता या विषयावर मांडणी सुबकपणे केली. मा.सुरेश सोलंकी सर यांनी उपस्थितींना मार्गदर्शन करताना सांगितले की मानव समाज, सामाजिक संस्था आणि सभासदांचे कर्तव्य ह्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वांना मी आज सांगू इच्छीतो की, सर्व प्रश्न आधी सलोख्याने सोडवा. अनुभवी सभासदांचा सामान्य सभासद जरी असला तरी त्याचा मान राखा.खुर्ची साठी, पदासाठी नुसती चढाओढ करू नका. ह्युमन राईट्स सेल युनिटच्या वतीने अशी प्रकरणे निकालात काढण्यासाठी स्वतंत्र न्यायालयीन यंत्रणा काम करते.तक्रार करणारा स्वतःच्या फायदयासाठी, फसवणूक करणारा, मंडळाचे नुकसान करणारा आहे का?आणि तसे असेल तर भारतीय दंड विधान ४२० कलम खाली त्याच्यावर कारवाई होते.भ्रष्ट कार्यकर्ता असेल तर तशीही कारवाई होते. मानव अधिकार संरक्षण अधिनियम १९९३ कलम १(३) नुसार २८/०९/१९९३ पासून हा कायदा केंद्र शासनाने लागू केला आहे.को.भू.सा.वि.सं अध्यक्ष मा.प्रकाशजी चांदीवडे सर यांनी जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्षपद सांभाळले. यावेळी तिन्ही संस्थाचे पदाधिकारी, सभासद, सा.धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप,शाहीर गजाजन तुपे, स्वराज्य लेख वृत्तवाहीनीचे पत्रकार श्री. दीपक बोराडे, झुगरेवाडी(कर्जत) तालुक्याचे शाळेचे मुख्यध्यापक रवी काजाळे,कुणबी समाजोन्नती संघाचे उपाध्यक्ष श्री.तुकाराम लाड,कुणबी स.संघ विभागीय वरळी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत निर्मळ, कुणबी स.संघ शाखा रत्नागिरीचे उपाध्यक्ष विजय घवाळी,सचिव श्री संजय माचीवले, श्री संदीप गावडे आणि को.भू.सा.वि.संस्थेचे उपाध्यक्ष बारे, प्रमोद साबळे, सोनिया मॅडम, सुरेश पालवे, जयेश, फैयाज, संजय काजारे इ. सभासद उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!