Kalyan Khadwali tribal ashram school concluded the concluding seminar of 'Journey to Udyan' | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

कल्याण खडवली आदिवासी आश्रम शाळेत ‘ध्येयाचा प्रवास’ कवी संमेलन संपन्न

कल्याण खडवली आदिवासी आश्रम शाळेत ‘ध्येयाचा प्रवास’ कवी संमेलन संपन्न

कल्याण (अश्विनी निवाते) : ध्येयाचा ध्यास काव्यमंच प्रस्तुत ‘ध्येयाचा प्रवास’ कवी संमेलनाचा ८ वा प्रयोग १४ जुलै रोजी कल्याण तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळा खडवली येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी निमंत्रित कवींचे कविसंमेलन पार पडले. यात निमंत्रित कवी म्हणून दिनेश ननोरे, सविता ननोरे, गुरुदत्त वाकदेकर, मास्टर राजरत्न राजगुरू, मिलिंद जाधव, विलास शिंदे, चैत्राली जोगळेकर, शुभदा ताकभाते, पुनम पंड्या, राज्ञी सोनावणे, राजेश साबळे, भाताडे, बापू तारमाळे व इसामे या कवींनी विविध विषयांवर स्वरचित व दर्जेदार कवितांचे यावेळी विद्यार्थ्यांसमोर सादरीकरण केले. यावेळी शाळेचे संस्थापक बाळू चव्हाण, सचिव अर्जुन चव्हाण, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शरद गोतारणे, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक दीपक चव्हाण, नामदेव भोईर, महेंद्र चंदे, अरुणा जाधव, नम्रता पाटील, मधुरा देसले, वैशाली हरड, साक्षी मोरे, शिरीष पानपाटील, जगदीश चव्हाण, स्वाती परटोफे तसेच इतर कर्मचारी वृंद उपस्थित होता. शालेय जीवनापासून मराठी साहित्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागृती होऊन मराठीचे महत्व कळावे, कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्हावे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे सविता ननोरे यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून वक्तृत्व व निबंध स्पर्धा घेतली. इयत्ता ५ ते ७ व इयत्ता ८ ते १० असे दोन गट होते. त्यात विजेत्यांना प्रमाणपत्र पुस्तक व पेन देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. सहभागी स्पर्धकांनाही प्रमाणपत्र मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे व सविता ननोरे यांनी तर आभारप्रदर्शन दिनेश ननोरे यांनी केले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts