K B. 'Raksha Bandhan Ceremony with Disabled and Disabled Children' organized by Women College, Thane | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

के. बी. महिला महाविद्यालय, ठाणे आयोजित ‘अपंग व मतिमंद मुलांसोबत रक्षाबंधन सोहळा’

के. बी. महिला महाविद्यालय, ठाणे आयोजित  ‘अपंग व मतिमंद मुलांसोबत रक्षाबंधन सोहळा’

नवी मुंबई (प्रतिनिधी) : के. बी. महिला महाविद्यालयाच्या डी. एल . एल . इ. व एक्सटेंन्शन विभागाने ऐरोली येथील अपंग मुलांसाठी काम करत असलेल्या ‘सेल्फ एसटीम फौंडेशन फॉर डिसेबल्ड’ या सेवाभावी संस्थेसोबत एका आगळ्या वेगळ्या प्रकारे ७३ वा स्वात्र्यदिन व रक्षाबंधन सोहळा साजरा केला. सदर कार्यक्रमात एकूण २२ विद्यार्थिनींसोबत दोन प्राध्यपिकींनी सक्रिय सहभाग नोंदवुन तेथील अपंग व मतिमंद मुलांसोबत झेंडावंदन केले व देशभक्तीपर गाणी गाऊन त्याच्या चेहऱ्यावर हसू फुलवले. योगायोगाने या दिवशी भावाबहिणीच्या अतूट नात्याचा पारंपारिक रक्षाबंधन सोहळा असल्याने आमच्या विद्याथ्रीनींनी त्याना गोडधोड खाऊ घालून हा दिवस साजरा केला. या आगळ्यावेगळ्या समारंभाने आमच्या मुलींना खूप काही शिकायला मिळाले.


या कार्यक्रमांचे नेतृत्व व समन्वय, डॉ. उषा भंडारे व प्रा प्रज्ञा गरड यांनी महाविद्यलच्या प्राचार्य डॉ. रेणू त्रिवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली केले. तसेच या कार्यक्रमासाठी विद्याथ्री प्रतिनिधी कु. पूनम दिवेदी व कु. निकिता यांनी विशेष मेहनत घेहून मोलाचे सहकार्य केले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts