जेष्ठ अभिनेत्री शुभा खोटे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

जेष्ठ अभिनेत्री शुभा खोटे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई (प्रतिनिधी) : अशोकपुष्प संस्थे च्या वतीने सलग चार वर्षे महिला दिना दिवशी विविध क्षेत्रातील नऊ महिलांचा स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलावंताचा गौरव करण्यात येतो. या वर्षी जीवन गौरव पुरस्कार साठ दशकांच्या वर आपल्या अभिनयाने मनोरंजन क्षेत्रात  योगदान देणाऱ्या अभिनेत्री शुभा खोटे यांचा सन्मान जीवन गौरव पुरस्कार देऊन करण्यात आला. हा पुरस्कार  जेष्ठ अभिनेता अंजन श्रीवास्तव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी आयोजक अनघा लाड, उमेश चौधरी, बालकलाकार हितार्थ पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. याच प्रकारे विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्वाने आपले योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान याचवेळी वाशी च्या विष्णुदास भावे नाट्यगृहात करण्यात आला. पुरस्कार प्राप्त महिलांमध्ये मोहिनी शबाडे (सह निर्माती व संस्थापिका ग्रेसफुल लिविंग फौंडेशन), नगरसेविका अंजली वाळुंज (राजकिय), मधुरा सुरपुर सराफ (झी २४ तास – पत्रकारिता), प्रियांका पांचाल (मिस लावण्यवती २०१८ आणि  क्वीन ऑफ नवी मुंबई २०१८), शिवानी साहिनी (नायिका), सुहासिनी पडाळे (शास्त्रीय नृत्य शिक्षिका), समाजसेविका ज्योती पाटील आणि समाजसेविका स्मिता केणी यांना स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

श्री करियर अकॅडेमी चे अशोक बाबर, पेशवाई सिल्क सारीज चे दीपक घनावत, नगरसेवक संजू वाडे , देवेंद्र खडसे, संकेत बांदेकर , अर्चना तेंडुलकर , सुनीता घायतडक , अभिनेत्री सिद्धी पाटणे यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!