जसलोक हॉस्पिटल करणार ३०० कोटींची गुंतवणूक

जसलोक हॉस्पिटल करणार  ३०० कोटींची गुंतवणूक

मुंबई (प्रतिनिधी) : जसलोक हॉस्पिटलने सांगितले की, संचालक मंडळाने सुविधा वाढविण्यासाठी पुढील पाच ते सहा वर्षात ३०० कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य संचालकांकडून चांगले प्रतिसाद मिळाल्यानंतर संस्थेने स्वत:च विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय संचालकांसह सहा बोलीदारांनी हॉस्पिटलच्या व्यवस्थापने मध्ये स्वारस्य दर्शविले होते.

      या विकासाबद्दल चर्चा करत आणि बाजारातील सर्व कल्पनांना विचारात घेऊन, जसलोक हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हरयाण यांनी सांगितले की, " रुग्णालयात झालेल्या संचालक ट्रस्ट मंडळ बैठकी मध्ये रुग्णालयाच्या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. विस्तारीत योजनेत अतिरिक्त ५० हजार चौरस फूट जमीन जोडणे आणि पुढील पाच-सहा वर्षांत ३०० कोटी रुपयांची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक करण्यात येणार आहे. नियोजनात्मक चर्चा केल्यानंतर, जसलोकच्या व्यवस्थापनाने निरंतर सुधारणा करण्याच्या ध्येयासह नूतनीकरण प्रकल्पाची सुरुवात केली आहे, तसेच डॉकटर आणि रूग्णांकडून अभिप्राय मागवले आहेत. २०२३ मध्ये नूतनीकरण पूर्ण होणा-या हॉस्पिटल मध्ये केवळ नैदानिक उत्कृष्टताच नव्हे तर अनुभवात्मक पुनर्प्राप्ती देखील निश्चित असेल. उत्कृष्टतेसह ,वैद्यकीय संस्था उपचारांच्या प्रगतीशील पद्धतींकडे लक्ष केंद्रित करेल, म्हणून आम्ही संस्थेमध्ये विशेष विभागीय दृष्टिकोन, आर्ट मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डे केअर सुविधा, संशोधन केंद्र अशा अनेक सुविधांचा विस्तार करणार आहोत."   

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!