Infra Development in Mumbai to open 12 .63 million sq m (136 million sq ft) of potential real estate: Knight Frank | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मुंबईतील इन्फ्रा डेव्हलपमेंट खुला करणार १२.६३ दशलक्ष चौरस मीटरचा (१३६ दशलक्ष चौरस फूट) संभाव्य रिअल इस्टेटचा पुरवठा: नाईट फ्रँक

मुंबईतील इन्फ्रा डेव्हलपमेंट खुला करणार १२.६३ दशलक्ष चौरस मीटरचा (१३६ दशलक्ष चौरस फूट) संभाव्य रिअल इस्टेटचा पुरवठा: नाईट फ्रँक

मुंबई, ११ फेब्रुवारी, २०२०: जागतिक रिअल इस्टेट कन्सल्टंट्स नाईट फ्रँक इंडियाने त्यांच्या नवीनतम अहवालात मुंबईच्या सध्याच्या ट्रांझिट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे १२.६३ दशलक्ष चौरस मीटर किंवा १३६ दशलक्ष चौरस फूट विकासाची क्षमता खुला करणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. “इंडिया अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर रिपोर्ट २०२० – स्पेशल फोकस ऑन मुंबई ट्रान्सपोर्ट इनफ्रास्ट्रक्चर विथ की इम्पेक्ट मार्केट्स” या ताज्या अहवालात ही बाब उघडकीस आली असून मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) मध्ये सध्या सुरू असलेल्या INR १.८ ट्रिलियन च्या परिवहन पायाभूत सुविधांच्या (मेट्रो आणि रस्ते) प्रकल्पांच्या परिणामांचा आढावा घेतो.

असा अंदाज आहे की एमएमआरमध्ये २४६ किलोमीटर (किमी) मेट्रो लाइन आणि ६८ किमी रस्ते प्रकल्प बांधकामांच्या विविध टप्प्यात आहेत. यातील काही प्रकल्प येत्या ३ वर्षांत कार्यान्वित होतील व त्याचा शेजारच्या रिअल इस्टेट वर त्वरित परिणाम होईल, तर इतर प्रकल्प पुढील ४-८ वर्षाच्या कालावधीत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

काही तत्काळ रिअल इस्टेटच्या विकासाची क्षमता खालीलप्रमाणे आहे:

·         गोरेगाव पश्चिम – मालाड पश्चिम, गोरेगाव पूर्व आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) च्या कार्यालयीन बाजारपेठांमध्ये अंदाजे कार्यालयीन जागा पुरवठा १.११ दशलक्ष चौरस मीटर (१२ दशलक्ष चौरस फूट), ०.९२ दशलक्ष चौरस मीटर (१० दशलक्ष चौरस फूट) आणि ०.६५ दशलक्ष चौरस मीटर (७ दशलक्ष चौरस फूट) अनुक्रमे अंदाजे आहे. हा संभाव्य नवीन पुरवठा सध्या या ठिकाणी विद्यमान असलेल्या कार्यालयीन साठाच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहे. या व्यतिरिक्त १.६७ दशलक्ष चौरस मीटर (१८ दशलक्ष चौरस फूट) चा निवासी व कार्यालयीन पुरवठा बोरिवलीच्या एफसीआय गोदामांमध्ये येऊ शकते, जर सरकारने लँड  पार्सलचे मुद्रीकरण करण्याचे ठरविले तर. या चार ठिकाणांना मेट्रो लाइन २ (दहिसर-अंधेरी-मंडळे), मेट्रो लाइन ७ (दहीसर-अंधेरी पूर्व) आणि मेट्रो लाइन ३ (कुलाबा-वांद्रे-एसइइपीझेड) द्वारे देण्यात येणाऱ्या सुधारित कनेक्टिव्हिटी व प्रवासाच्या वेळेतील कपातीमुळे फायदा होईल. यापैकी काही बाजारपेठे जसे गोरेगाव पश्चिम – मालाड पश्चिम बेल्ट आणि बीकेसीमध्ये एमआरटीएस कनेक्टिव्हिटीची कमतरता होती. पीक अवर दरम्यान महामार्ग प्रवेश बिंदू किंवा जवळच्या रेल्वे स्थानकावरून या व्यवसाय जिल्ह्यांमध्ये पोहोचण्यासाठी अर्धा तास लागतो. एकदा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर, त्या कालावधीत जवळजवळ अर्धा मेट्रो कॉरिडोरचा प्रवास केला जाऊ शकतो. या प्रकल्पांद्वारे प्रवासाच्या वेळेत ७५% पर्यंत कपात केली जाऊ शकते, ज्यामुळे ३ दशलक्ष प्रवाशांना फायदा होऊ शकतो, जे दररोज हे ३ मेट्रो लाइन वापरण्याची अपेक्षा आहे.

·         वडाळा ट्रक टर्मिनस (डब्ल्यूटीटी) एमएमआरडीएच्या कक्षेत आणण्यात आला असून बीकेसी समान हे स्थान विकसित करण्याचा मानस आहे. या क्षेत्रात सुमारे ४.६ दशलक्ष चौरस मीटर (५० दशलक्ष चौरस फूट) कार्यालय व रहिवासी पुरवठा अपेक्षित आहे, जर एफएसआय ४ असेल तर. मेट्रो लाइन २ व ४ जे सर्वात लांब (४२ किमी) आणि दुसरी सर्वात लांब (३५ किमी) आहे, शहरातील मेट्रो लाइन या क्षेत्रातून जातील आणि या क्षेत्रातील रिअल इस्टेट कर्षणाला चालना देईल. मेट्रो लाइन २ याला पश्चिम उपनगराच्या दाट लोकवस्तीच्या बाजारपेठेशी जोडेल व मेट्रो लाइन ४ याला ठाणे-कासरवडवली पट्टापर्यंत मध्यवर्ती उपनगराच्या दाट लोकवस्तीच्या बाजारपेठेशी जोडेल. पुढे मेट्रो लाइन ११ (वडाळा-सीएसएमटी) सीएसएमटी पर्यंत दक्षिण मुंबईसह या क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटीला चालना देईल. वडाळा हा एमएमआरच्या मध्यभागी आहे आणि ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, ईस्टर्न फ्रीवे आणि सायन-पनवेल हायवेद्वारे शहराच्या विविध भागांशी चांगल्या रोड  कनेक्टिव्हिटीचा आनंद घेतो. मेट्रोमुळे या क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटी आणि प्रवेशास आणखी चालना मिळेल, ज्यामुळे रिअल इस्टेटला अधिक कर्षण मिळेल.

·         जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड (जेव्हीएलआर) हा एक महत्त्वाचा धमनी रस्ता आहे जो शहरातील पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या क्षेत्रातील मेट्रो लाइनच्या विकासामुळे एसईईपीझेड-पवई पट्ट्यात आणि महाकाली केव्स मेट्रो स्थानकाजवळील कार्यालयाच्या जागेचा विकास होईल, जे १.८ दशलक्ष चौरस मीटर (२० दशलक्ष चौरस फूट) आणि ०.६५ दशलक्ष चौरस मीटर (०७ दशलक्ष चौरस फूट) च्या कार्यालयीन जागेचा पुरवठा पाहू शकतात. या बाजारामधील सध्याच्या ऑफिस स्टॉकपेक्षा हे जास्त आहे. याव्यतिरिक्त, कांजूरमार्गजवळील रिक्त जमीन पार्सल १.११ दशलक्ष चौरस मीटर (१२ दशलक्ष चौरस फूट) च्या कार्यालय आणि निवासी पुरवठा पाहू शकतात. या मार्गावर अनेक स्थापित निवासी व कार्यालयीन कॅचमेंट आहेत, ज्यात एमआरटीएस कनेक्टिव्हिटीचा अभाव आहे. हा एक धमनीचा रस्ता असल्याने दिवसभर या रस्त्यावर वाहनांची ट्रॅफिक जास्त असते. मेट्रो लाइन ६ ज्याची दररोज ४,००,००० राइडरशिप असणे अपेक्षित आहे, हे जेव्हीएलआरसह एमआरटीएस कनेक्टिव्हिटी आणेल.

·         यातील अनेक पायाभूत प्रकल्प एमएमआरमध्ये रिअल इस्टेट विकासात पिछाडीवर आहेत, तर असे काही प्रकल्प आहेत जे त्यांच्या क्षेत्रातील रिअल इस्टेट विकासात आघाडीवर असतील. मेट्रो लाइन १२ (कल्याण-तळोजा) हा असा उदाहरण आहे, जिथे हा प्रकल्प अविकसित क्षेत्रातून जाणार आहे. मेट्रो लाइन १२ सह सोनारपाडा मेट्रो स्टेशन आणि पिसार्वे मेट्रो स्टेशन दरम्यानचा पट्टा एमएमआरडीए आणि सिडको संयुक्तपणे ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी) च्या धर्तीवर विकसित केला जाईल. मेट्रो मार्गावर १,९२,४२० प्रवाशांची रोजची राइडरशिप असणे अपेक्षित आहे.

·         पायाभूत सुविधांच्या विकासामुळे एक विशिष्ट क्षेत्राचा विकास होत असल्याचा आणखी एक उदाहरण म्हणजे चिरले आणि कासरवडवली-गायमुख पट्टा (ठाणे). सध्या ही स्थाने एमएमआरच्या विलग भागात आहेत, जिथे प्रवेश करणे कठीण आहे. एकदा ट्रान्स हार्बर लिंक (सिवरी-न्हावा शेवा) आणि मेट्रो लाइन ४ (ठाणे-वडाळा) आणि मेट्रो लाइन १० (ठाणे-मीरा रोड) तयार झाल्यावर ही स्थाने मुंबईशी जोडली जातील आणि यामुळे या बाजारात रिअल इस्टेटचा जलद विकास होईल. ट्रान्स हार्बर लिंक दररोज १,००,००० वाहनांची पूर्तता करण्याची अपेक्षा आहे आणि दोन्ही मेट्रो मार्गाने नजीकच्या भविष्यात दररोज १.२ दशलक्ष प्रवासी वाहतूक करणे अपेक्षित आहे. ट्रान्स हार्बर लिंक तयार झाल्यावर दक्षिण मुंबईहून चिर्ले पर्यंतची प्रवासाची वेळ २०-२५ मिनिटांवर पोहोचेल.

रिअल इस्टेट मार्केटचे भवितव्य ठरविण्यासाठी पायाभूत सुविधा विकास आणि शहरातील रोजगाराच्या केंद्रांपर्यंत कनेक्टिव्हिटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. मुंबईतील बहुतेक पायाभूत सुविधा प्रकल्प रिअल इस्टेट विकासाच्या वेगाशी मॅच करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर एमएमआरमधील आगामी ट्रान्झिट-ओरिएंटेड प्रकल्पांचा प्रमाण रिअल इस्टेटच्या सहभागासाठी शक्यता खुला करेल,” असे नाईट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts