बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीच्या ११ व्या शाखेचे कल्याण नगरीत उद्घाटन

बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीच्या ११ व्या शाखेचे कल्याण नगरीत उद्घाटन

कल्याण (सुर्यकांत गोडसे) : बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीच्या ११ व्या शाखेचे उद्घाटन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कल्याण नगरीत शनिवार दिनांक ०९/०३/२०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता कल्याण पूर्वचे आमदार गणपतशेठ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. सदर उद्घाटनप्रसंगी कल्याण पूर्वचे नगरसेवक सचिन पोटे व संस्थेचे संस्थापक जयवंत डोंगरे, संस्थेचे वसंतराव गावडे, उपाध्यक्ष मनोहर डोंगरे, सचिव दामाजी डोंगरे, खजिनदार शरद डोंगरे यांनी दीपप्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात केली.तसेच संस्थेचे ज्येष्ठ संचालक कै. अशोक गजानन गावडे, यांच्या प्रतिमेला संस्थेचे संचालक आनंद गावडे यांनी पुष्पहार अर्पण करून कल्याण नगरीत शाखा उघडण्याबाबतच्या त्यांच्या स्वप्न पूर्तीस उजाळा दिला.

सदर कार्यक्रमास कल्याण शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व उद्योजक उपस्थित होते.तसेच सर्व संचालक, सल्लागार, अधिकारी,कर्मचारी आणि सभासद उपस्थित होते .

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!