Hussain Dalwai's request for farmers and fishermen in Konkan handed over to CM | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

कोकणातील शेतकरी व मच्छीमार यांच्या मागण्यांचे निवेदन खासदार हुसेन दलवाईंकडून मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

कोकणातील शेतकरी व मच्छीमार यांच्या मागण्यांचे निवेदन खासदार हुसेन दलवाईंकडून मुख्यमंत्र्यांना सुपूर्द

मुंबई(प्रतिनधी): कोकणातील शेतकरी व मच्छीमार यांच्या मागण्यांचे निवेदन खासदार हुसेन दलवाई यांनी महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिले.
यावेळी खासदार दलवाई यांनी यावर्षी अतिवृष्टी, वादळ व अवकाळी पावसामुळे रत्नागिरी- सिंधुदुर्ग – रायगड व ठाणे म्हणजे एकूणच कोकणात कशाप्रकारे शेतकऱ्यांचे व मच्छीमारांचे अतोनात नुकसान होवून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे हे विशद करून कोकणातील शेतकरी व मच्छीमार यांना तातडीनं नुकसान भरपाई मिळण्याकरिता निर्णय घेण्याबाबत विनंती केली. यावेळी खा. हुसेन दलवाई यांच्यासोबत हुस्नबानो खालिफे (आमदार), युवराज मोहिते, निलेश घाग यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts