Horizon Dance Academy conducted a terrific response to the third episode of Rhythm | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

हॉरीझॉन डान्स अकॅडेमी आयोजित ताल च्या तिसऱ्या पर्वाला भरघोस प्रतिसाद

हॉरीझॉन डान्स अकॅडेमी आयोजित ताल च्या तिसऱ्या पर्वाला भरघोस प्रतिसाद

नवी मुंबई (प्रतिनिधी) : मॅक्स कुमार आणि मेघा सोनावणे संचालित हॉरीझॉन डान्स अकॅडेमीच्या वतीने ताल या वार्षिक संमेलनाचे मोठया उत्साहात नुकतेच आयोजन करण्यात आले होते. सिडकोच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमात आमदार व लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक , माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेवक सुरज पाटी, डॉ संजीव नाईक, डॉ विजय शुक्ला,डॉ संजीव कुमार, डायनीमिक क्रिव्हचे स्वप्निल पाटील, गजानन म्हात्रे, अवनी तोमर , डॉ शिवा मुदिगेरे टू द कल्चर आणि प्रेक्षक मोठया संख्यने उपस्थितीत होते. यावेळी विविध प्रकारचे नृत्य प्रकार उपस्थित कलाकार व प्रेक्षकांस अनुभवयास मिळाले. विशेष म्हणजे शेकडो विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात आपल्या नृत्याने संर्वाची मने जिंकलीत. यावेळी कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची कहाणी सांगणारे नृत्य सर्वांना आवडले.


हॉरीझॉन डान्स अकॅडेमीचे संचालक मॅक्स कुमार आणि मेघा सोनावणे यांनी सांगितले की ” या वर्षी वार्षिक समारोहासह क्रिव्ह स्पर्धा आयोजित केली. नवी मुंबई मध्ये आम्ही व्यासपीठ निर्माण करतो .  आमच्या माध्यमातुन विविध ठिकाणी जसे कि रबाळे , ऐरोली , भिवंडी येथे नृत्याचे धडे दिले जाते या मागे सर्व टीमची मेहनत असते. या कार्यक्रम यशसवी करण्याकरीता आमचे सर्व प्रशिक्षक महत्वाची भूमिका निभावतात. या मध्ये सागर यादव,लखन पाखरे,पवन मोरे , रोहित सिंह, गौरी पवार, वेदिका पवार, हर्ष बैरागी, हर्षल पलांडे, सपना दास ,मानसी पिसाळ, सिया शिर्के, सुहानी शेलार, गोलू साहू, अनिकेत दुबे .
खुषी वर्मा, तन्वी चोपडे, प्रथमेश बनसोडे, रोहित राठोड, डेमिन मॉन्टेरिओ,शुभम साजेकर,निसर्ग भोईटे, मानसी भोसले,प्राची नालंदे, आचल सोनवणे यांचा समावेश आहे.   या कार्यक्रमात बॉलीवुड, हिपहॉप, जैज फंक, क्रम्पिंग, कंन्टेप्ररी, अर्बन असे नृत्य प्रकार विद्यार्थ्यांनी सादर केले. यावेळी परीक्षक म्हणून आकाश पटनुरे , सचिन स्वामी , सिंधू नाय्यर उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते  सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts