एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोलपंपासह सार्वजनिक ठिकाणच्या सरकारी जाहिराती तात्काळ काढाः सचिन सावंत

एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोलपंपासह सार्वजनिक ठिकाणच्या सरकारी जाहिराती तात्काळ काढाः सचिन सावंत

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि. १० मार्च रोजी पासून लागू झालेली आहे. असे असतानाही राज्यभरातील एसटी बसेस, बस थांबे, पेट्रोल पंपासहित इतर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सरकारी जाहिराती अद्याप काढण्यात आलेल्या नाहीत. निवडणूक आयोगाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. याचा जाब निवडणूक आयोगाने सरकारला विचारून संबंधितांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांना पत्र लिहून केली आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!