कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देऊ – कामगार मंत्री डॉ. संजय कुटे

कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय देऊ – कामगार मंत्री डॉ. संजय कुटे

कंत्राटदार बदलला तरी कर्मचारी तेच  ठेवण्याची – महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाची मागणी

मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) – कंत्राटदार बदलला तरी कर्मचारी ठेवावेत अशी लेखी निवेदनाद्वारे शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने नवनिर्वाचित महाराष्ट्र शासन मंत्रालय कामगार मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या कडे केली आहे.

यावेळी मुलाणी म्हणाले की, राज्यात मंत्रालय ते ग्रामपंचायत पर्यंत विविध शासकीय तसेच निम शासकीय कार्यालयात बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी विविध विभागात काम करत आहेत. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहेत. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे बाह्यस्त्रोत कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. कंत्राटी कर्मचारी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना यशस्वी करत आहेत. परंतु, अनेक ठिकाणी राजकीय हेवेदावे यामुळे कर्मचारी बळी पडत आहेत. त्यांना कामावरून कमी केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते. अनेक दिवस काम करून संबंधित कर्मचाऱ्याला कामाचा अनुभव आलेला असतो. आपल्या प्रगतीशील आणि पारदर्शी सरकार मध्ये कंत्राटदार बदलला तरी कर्मचारी तेच ठेवल्यास काम करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याबाबतचा शासनाच्या वेळ आणि पैसा या दोन्ही गोष्टींची बचत होईल. त्यानुषंगाने त्याच पदासाठी कंत्राट मागवले असता तेच कर्मचारी ठेवावेत. असे शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ यांनी सांगितले.

त्यावर महाराष्ट्र शासन मंत्रालय कामगार मंत्री डॉ. संजय कुटे म्हणाले की, हे सरकार शेतकरी व कामगार यांचे सरकार आहे त्याअनुषंगाने बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळून देऊ असे सांगितल्याचे मुलाणी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव अजोय मेहता यांना ईमेल द्वारे व समक्ष सदर निवेदन दिले असता आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन प्रधान सचिव सीताराम कुंटे, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजीव कुमार, तसेच वित्त विभागाला कळवले आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष तथा याचिकाकर्ते मुकूंद जाधवर, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!