गणेश शिगवण यांच्या रांगोळी प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक

गणेश शिगवण यांच्या रांगोळी प्रदर्शनाचे सर्वत्र कौतुक


दापोली (प्रतिनिधी) : दापोली येथील आपटी गावातील रणभैरी वारकरी संप्रदाय मंडळाच्या वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आरोग्य शिबीर सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध रोंगोळींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.


सध्याचा उन्हाळा आणि त्यामुळे होणारे डीहायड्रेशन, डोकेदुखी आणि ताप यांसारखे आजार यावर प्राथमिक उपचार म्हणून, डॉ. जागीरदार आणि त्यांच्या टीमने गावातील नागरिकांचे विनामूल्य हेल्थ चेक-अप केले आणि आरोग्याबाबत जनजागृती केली.


या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहिले ते रांगोळी प्रदर्शन, गावातील हुरहुन्नरी कलाकार श्री. गणेश शिगवण यांनी आपला अमूल्य वेळ आणि अथक मेहनत करून प्रदर्शनातील कलात्मक, वास्तविक, प्रबोधनात्मक आणि सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. या रांगोळ्या देशपातळीवरील असल्याचे म्हणत मान्यवरांनी त्याचे कौतुक केले.


या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवासेनेचे नेते श्री. योगेश कदम, मंडळाचे अध्यक्ष श्री. शंकर बैकर, श्री. दीपक बैकर (सरपंच), श्री. नितीन राणे (पोलीस पाटील), श्री. बैकर गुरुजी, (मुख्याध्यापक आपटी शाळा) मुंबई मंडळाचेअध्यक्ष श्री. सुरेश घडवले तसेच ग्रामपंचायत सदस्य मान्यवर आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!