Gandhi family's decision to remove SPG security through political revenge: MLA Balasaheb Thorat | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धीतूनः आ. बाळासाहेब थोरात

गांधी कुटुंबियांची एसपीजी सुरक्षा काढण्याचा निर्णय राजकीय सूडबुद्धीतूनः आ. बाळासाहेब थोरात

मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस अध्यक्षा खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने राजकीय सूडबुद्धीने घेतला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

भाजप सरकारच्या या विद्वेषी कृतीचा तीव्र निषेध करून आ. थोरात म्हणाले की, विरोधी पक्षांशी राजकीय सुडबुद्धीने वागणे ही मोदी शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजपची कार्यपद्धती राहिली आहे. मोदी, शाह यांना विरोध आणि विरोधी पक्षच मान्य नाही, म्हणून ते सातत्याने विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करत आहेत हे देशातील जनता पहात आहे. गांधी कुटुंबातील दोन सदस्य देशाचे पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी अतिरेकी हल्ल्यात शहीद झाले याचा भाजप सरकारला विसर पडला आहे का? असा संतप्त सवाल करून सरकारने सूडाचे राजकारण थांबवून गांधी कुटुंबियांना एसपीजी सुरक्षा प्रदान करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts