जागतिक महिल्या दिनाच्या निमित्ताने भायखळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

जागतिक महिल्या दिनाच्या निमित्ताने भायखळा येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई (अश्विनी निवाते) : जल्लोष नारी शक्ती फाऊंडेशन, सकाळ तनिष्का व्यासपीठ व जय गृरुकृपा पतसंस्था मर्यादित यांच्या विद्यमाने ब्रम्ह विष्णू सहजीवन गोकुळ अ, ब पटांगण, बकरी अड्डा, भायखळा, मुंबई. ४०००११ या ठीकाणी जागतिक महिल्या दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे डाॅ.राजश्री कटके(स्रीरोग तज्ज्ञ,
जे.जे.रुग्णालय, डाॅ.गौरी चव्हाण( काॅस्मेटीकलाॅजीक)ट्रायकोलाॅजीस्ट), डाॅ.रुपा चव्हाण(एम् .बी.बी. एस् ), डाॅ. शितल घोरपडे, (बी.एच.एम.एस)यांनी ‘निरोगी जीवन हक्क माझा, खास महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन’ या विषयावरती मोलाचे मार्गदर्शन केले.महिलांसाठी कॅटवाॅक, पासिंग द बाॅल, चमचा लिंबू यांसारख्या विविध स्पर्धेंचे आयोजन व प्रत्येक सहभागी महिलांना भेटवस्तू, विजेत्यांना महिलांना आकर्षक पारितोषिके, मुलगा मुलगी आहे समान दोघेही उंचावतील देशाची मान या पंक्तीला अनुसरून ज्यांना एक मुलगी आहे अशा तीस महिलांचा सत्कार, पतीच्या निधना नंतर स्वकर्तुत्वावर/स्वबळावर एक हाती संसार सांभाळून मुलांना स्वावलंबन शिकवणार्‍या २३ महिलांचा सन्मानार्थ सत्कार करण्यात आला. ‘झिंग झिंग झिंगाट’ अंताक्षरी कार्यक्रम मराठी ७ गट, ७० महिलांचा सहभाग व ३ गटांना पारितोषिके देण्यात आली. जवळपास ४०० ते ५०० महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सर्व भगिनी मंडळ, पदाधिकारी सभासद यांनी विशेष मेहनत घेतली.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!