FilmNation "spontaneous response to film and media workshops | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

फिल्मनेशन” फिल्म आणि मिडिया कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

फिल्मनेशन” फिल्म आणि मिडिया कार्यशाळेला उत्स्फुर्त प्रतिसाद

नवी मुंबई (प्रतिनिधी) : चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार तसेच दिग्दर्शक यांच्या सानिध्यात राहून तीन दिवसीय कार्यशाळेचा अनुभव उपस्थितांनी घेतला. या कार्यशाळेच्या माध्यमातुन अनेकांना या क्षेत्राचे ज्ञान अगदी जवळून अनुभवता आले. एक सहभागी विद्यार्थी प्रशांत राजाराम घुगरे यांनी सांगितले कि “आतापर्यंत अभिनय, सिनेमा संबधी बऱ्याच कार्यशाळेचा चांगला बऱ्यापैकी अनुभव घेतला आहे. त्याची काही किमंत पण मोजलेली आहे. पण कोणतेही शुल्क न लावता चित्रपट सृष्टीतील दिग्गजांना समवेत कार्यशाळेत सुसंवाद साधता आला आणि खूप काही शिकता आले.”  या कार्यशाळेत पहिल्या दिवशी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितीन कक्कर , दिग्दर्शक राजू पार्सेकर, दृष्यम फेम अभिनेता कमलेश सावंत ,सिंघम फेम अभिनेता विनीत शर्मा तसेच तप्तपदी फेम अभिनेता कश्यप परुळेकर यांनी सहभागी विद्यार्थ्यांशी सवांद साधला व आपल्या कामाचा अनुभव सांगितला.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी जेष्ठ पत्रकार रवी तिवारी यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आपला वीस वर्षाचा प्रवास उलगडला त्यांनी घेतलेली  सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची प्रसिद्ध मुलाखत मोठया पडद्यावर दाखविण्यात आली. दुपारच्या सत्रात रेडिओ जॉकी निधी व अ‍ॅनिमेशन – ग्रापिक्स विषयी गौतम अकुला यांनी माहिती दिली. संध्याकाळी सर्वांना लोकमतच्या कार्यलयात जाऊन तेथील कार्यपद्धती जाणुन घेता आली यावेळी पत्रकार समीर कुलकर्णी यांच्याशी सर्वांनी दिलखुलास संवाद साधला व आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळवलीत. याच बरोबर जेष्ठ पत्रकार नामदेव मोरे व लोकमत समुहाचे सह उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनी सुसंवाद साधला. तिसऱ्या दिवसाची माहिती देताना फिल्मनेशन चे आयोजक उमेश चौधरी यांनी सांगितले कि ” शेवटच्या दिवशी सहभागींना आम्ही “ह.म.बने तु.म.बने” या मालिकेच्या सेट वर घेऊन गेलोत. त्याठिकाणी जेष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्याशी गप्पा मारत संवाद साधला यावेळी अभिनेत्री आदिती सारंगधर, अभिनेत्री राणी गुणाजी, अभिनेता सचिन देशपांडे यांनी सुद्धा सर्वांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यात. तसेच  चित्रीकरण कसे केले जाते हे सर्वांनी कलाकारांकडून सममजून घेतले.”
शेवटच्या सत्रात “फिल्मनेशन” कार्यशाळेच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व डियाडेम मिस इंडियाच्या उप विजेत्या शमा शेख, फिल्क्समेट चे नूर आलम शेख , सिनेमॅटिक चे अमितराज निर्मल व कार्यशाळेच्या संयोजिका अनघा लाड यांच्या हस्ते सर्वांना प्रशस्ती पत्र देण्यात आले. 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts