Filmnation goldsmith for making his debut in Film & Media - Actor Pankaj Vishnu | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्रपटसृष्टी व मिडीया या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांसाठी फिल्मनेशन सुवर्णसंधी- अभिनेते पंकज विष्णू

चित्रपटसृष्टी व मिडीया या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांसाठी फिल्मनेशन सुवर्णसंधी- अभिनेते पंकज विष्णू

तीन दिवसीय फिल्मनेशन मोफत “फिल्म आणि मिडीया कार्यशाळा” चित्रपट सृष्टीतील नामवंताचे मार्गदर्शन
नवी मुंबई (प्रतिनिधी) : चित्रपटसृष्टी तसेच मिडिया मधे आपले करियर घडविण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. अश्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावे तसेच या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे कलावंत तंत्रज्ञ यांच्या अनुभवातून शिकता यावे याकरिता “फिल्मनेशंन” या फिल्म व मिडिया कार्यशाळेचे दिनांक ११ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०१९ या तीन दिवसात वाशी येथील सिनेबज अकॅडेमी ,दुसरा माळा, योग विद्या निकेतन, वाशी डेपोच्या मागे वाशी नवी मुंबई येथे  मोफत आयोजन होणार आहे. या बाबतची सविस्तर माहिती देण्याकरिता पत्रकार परिषेद बोलविण्यात आली होती. यावेळी अभिनेते पंकज विष्णू व डियाडम मिस इंडिया ची उपविजेती शमा शेख व आयोजकांनी फिल्मनेशन विषयी अधिक माहिती दिली. अभिनेते पंकज विष्णू  यांनी सांगितले की “चित्रपटसृष्टी व मिडीया या क्षेत्रात पदार्पण करणाऱ्यांसाठी फिल्मनेशन हि कार्यशाळा सुवर्णसंधी आहे. आयोजक हि कार्यशाळा मोफत उपलब्ध करून इच्छुकांसाठी या क्षेत्राची तोंडओळख  करून देत आहेत.” डियाडम मिस इंडिया ची उपविजेती शमा शेख हिने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना सांगितले कि ” तरूणाई ला ज्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करायचे आहे त्यांनी मेहनत घेणे आवश्यक आहे. कलागुणांना योग्य वाव मिळावा या साठी मी ब्रँड अँबेसेडर म्हणून फिल्मनेशन शी जुळली आहे.”
      या कार्यशाळेच्या माध्यमातून जे या क्षेत्रात आपले करियर घडविण्याच्या तयारीत आहेत अश्या सर्वांसाठी तीन दिवस खुप काही शिकता येईल. कारण राष्ट्रीय पुरस्कर प्राप्त दिग्दर्शक नितीन कक्कर व इतर चित्रपट सृष्टीतील नामवंत या कार्यशाळत मार्गदर्शन करणार आहेत. सत ना गत, तीन बायका फजिती ऐका, पोलिस लाईन, अहिल्या तसेच अनेक मालिकांचे यशस्वी दिग्दर्शक राजू पार्सेकर आपल्या अनुभवाचे बोल सांगणार आहेत. मन उधान वाऱ्याचे  या मालिकेतुन घराघरात पोचलेला  व तप्तपदी या गाजलेल्या चित्रपटातील मुख्य भूमिका निभावणार अभिनेता कश्यप परुळेकर या वेळेस अभिनयाचे तसेच दिग्दर्शन या विषयवार सखोल महीती देणार आहेत. त्याचबरोबर रेडीयो जॉकी निधी साहू , अकुला गौतम क्रिएटिव्ह ग्राफिक्स हेड सिनेमा टीव्ही व इतर मान्यवर उपस्थित रहाणार व मार्गदर्शन करतील.


  या तीन दिवसांमधे चित्रपट दाखवण्यात येइल तसेच दिग्दर्शक आपले मनोगत व्यक्त करतील. मालिकांची शूटिंग कश्या प्रकारे चालते या बाबत सुद्धा शूटिंग च्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन केले जाणार.यामध्ये हम बने तुम बने या टीव्ही  मालिकाचे चित्रीकरण सहभागी विद्यार्थ्यांना बघता येईल तेंव्हा जेष्ट अभिनेते प्रदीप वेलणकर संवाद साधतील. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी सहभागी सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येइल व .या बाबत आयोजक उमेश चौधरी यांनी अधिक माहिती देताना सांगितले की “नवी मुंबई शहरात खुप मोठ्या प्रमाणात विविध टॅलेंट आहे कोणी दिग्दर्शन क्षेत्रात तर  कोणी अभिनय  क्षेत्रात नशीब आजमावण्यासाटी  धडपडतो आहे.परंतु आपल्या अंगी कोणते योग्य कलागुण आहेत, जेणे करून त्यांची ओळख होऊन योग्य मार्गक्रम करता येईल.फक्त   मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रात काम कसे मिळवता येइल. या सगळ्या गोष्टींचे शिक्षण व योग्य मार्गदर्शन  या माध्यमातून देणार आहोत ते ही दिग्गजांच्या उपस्थितीत ज्यानी हे क्षेत्र अगदी जवळुन बघितले आहे. या तीन दिवसीय कार्यशाळेत सहभागी   होण्याकरिता www.flixmates.com या संकेत स्थळाला भेट देऊन मोफत नाव नोंदविता येणार आहे या करीता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या कार्यशाळेच्या आयोजन समितीवर सिनेबज अकॅडेमी चे संचालक किरण सावंत, ए व्ही प्रॉडेक्शन्स चे अक्षय जाधव, विशाल गिरी, संतोष गंभीरे, दि फेरिक चे श्रीनिथ नायर , झिशान ठाकूर, फ्लिक्समेट्स चे  नुर आलम  सिद्दीकी , सिनेमॅटिकचे अमितराज निर्मल यांचा समावेश आहे.  
अधिक माहिती करिता संपर्क करा ९०२२७४४०४०. 

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts