Ekta World raises funds to help Childhood Cancer Care Center access life through Artists for a Cause | Aaplaa Vyaaspith news

Monday, October 21, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

एकता वर्ल्डने ‘आर्टिस्ट्स फॉर अ कॉझ’ द्वारे बालपण कर्करोग सेवा केंद्र ऍक्सेस लाईफला मदत करण्यासाठी निधी उभारली

एकता वर्ल्डने ‘आर्टिस्ट्स फॉर अ कॉझ’ द्वारे बालपण कर्करोग सेवा केंद्र ऍक्सेस लाईफला मदत करण्यासाठी निधी उभारली

शालेय शिक्षण, क्रीडा व महाराष्ट्राचे युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी कार्यक्रम सुशोभित केले, ‘आर्टिस्ट्स फॉर अ कॉझ ‘ ने विविध शैलीच्या प्रसिद्ध कलाकारांना एकत्र आणले

मुंबई(प्रतिनिधी) :मनोरंजन, संगीत, नृत्य आणि आनंदासह परिपूर्ण फन फिल्ड इव्हनिंगचा अंत झाला कारण एकता वर्ल्ड द्वारे आयोजित ‘आर्टिस्ट्स फॉर अ कॉझ’ चा समारोप झाला. बालपण कर्करोग सेवा केंद्र ऍक्सेस लाइफच्या समर्थनासह समीर दाते द्वारे आयोजित एकता वर्ल्ड सहित कर्क रोगाशी झुंज देत असलेल्या मुलांना आधार देण्याकरिता निधी उभारण्यासाठी विविध शैलीतील कलाकारांना परफॉर्म करण्यास एकत्र आणले.

शालेय शिक्षण, क्रीडा व महाराष्ट्राचे युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी या कारणासाठी आपला आधार दर्शवित कार्यक्रमाला सुभोभित केले. जागतिक स्तरावर प्रख्यात गायक समीर आणि दीपाली दाते, भारतातील पहिली महिला तबला वादक अनुराधा पाल, सुप्रसिद्ध आणि उत्कृष्ट चित्रकार संगीता बबानी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध नृत्यांगना झिया नाथ काही परफॉर्मर्स होते जे संगीत, कला आणि नृत्यच्या मिश्रणासहित मोठ्या कौझसाठी आशा वाढवण्याकरीता एकत्र आले.

या प्रसंगी बोलताना एकता वर्ल्डचे अध्यक्ष श्री अशोक मोहनानी यांनी म्हटले, “आम्ही सामाजिक सुधारणासाठी भाग घेण्याकरीता व पुढाकारांसाठी अग्रगण्य राहण्यास सुनिश्चित करण्यासाठी सतत प्रयत्न करतो. आमच्या पुढाकाराने ऍक्सेस लाईफमध्ये बऱ्याच जीवनांवर प्रेरणादायी परिणाम पडणार असल्याचा मला प्रचंड अभिमान वाटत आहे.”

ऍक्सेस लाइफ असिस्टन्स फाऊंडेशन, सेक्शन ८ कंपनी म्हणून नोंदणीकृत असलेली एक भारतीय नॉन-प्रॉफिट संस्था, मुंबईत आपल्या मुलांच्या कर्करोग उपचारांसाठी येणाऱ्या कुटुंबांना बहु-अनुशासनात्मक समर्थन सेवा प्रदान करते. ते कर्करोगासाठी उपचार घेत असलेल्या मुलांसाठी त्यांच्या पालक किंवा काळजीवाहू सह प्रेमळ आणि तात्पुरते घर प्रदान करते.

ऍक्सेस लाइफने चेंबूरमध्ये जून २०१४ ला आपले पहिले केंद्र उभारले होते आणि आता मुंबई व ठाणे येथे त्यांचे ६ बालपण कर्करोग सेवा केंद्र आहेत. त्यांच्या ६ केंद्रांद्वारे त्यांनी ३५० हून अधिक कर्करोग ग्रस्त वंचित बालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना समग्र आधार दिला आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts