Dr. Shankarrao Chavan celebrates the birth anniversary of various activities | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

जन्मशताब्दी वर्षाला जलदिंड्या, महारक्‍तदान व वृक्षारोपणाने प्रारंभ

नांदेड (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय गृहमंत्री, जलसंस्कृतीचे जनक दिवंगत डॉ.शंकरराव चव्हाण यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहर व जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जलदिंड्या, महारक्‍तदान शिबिर,वृक्षारोपण आदी कार्यक्रमांच्या माध्यमातून डॉ.शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. शहरातील चार भागातून निघालेल्या जलदिंड्या नांदेडकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरल्या होत्या.

सकाळी ९ वाजता धनेगाव येथील डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जावून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, आ.अमिता चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ.शरद रणपिसे, आ.वसंतराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांनी समाधीचे दर्शन घेतले.

डॉ.शंकरराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष समितीच्या वतीने वर्कशॉप कॉर्नर, विजयनगर, अण्णाभाऊ साठे चौक, वजिराबाद मुथा चौक या ठिकाणांहून लेझीम पथक, पथनाट्य, चित्रफिती यासह जलदिंड्यांचे आयोजन करण्यात आले होते. या जलदिंड्यांमधून ‘पाणी हेच जीवन’ हा संदेश देण्यात आला. या जलदिंड्यांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्याचे सादरीकरण केले. या जलदिंड्यांमध्ये महात्मा फुले हायस्कुल, बाबानगर व विजयनगर, सावित्रीबाई माध्यमिक शाळा, सिडको येथील इंदिरा गांधी शाळा, शारदा भवन हायस्कुल, गुजरात हायस्कुल, राष्ट्रमाता विद्यालय यांनी सहभाग नोंदविला. सर्व जलदिंड्यांची सांगता डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या पुतळा परिसरात झाली. काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या महारक्‍तदान शिबिरात १३५० रक्‍तदात्यांनी रक्‍तदान करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला.

शहरासह जिल्ह्यातील विविध भागात वृक्षारोपण करून शंकरराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले. पुतळा परिसरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, आ.डी.पी.सावंत, माजी खा.सुभाष वानखेडे, आ.शरद रणपिसे आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी केले तर आभार प्रदर्शन आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts