Dr. Lina Kedare announces gold medal at Savitribai Phule Pune University | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

डॉ. लीना केदारे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुवर्णपदक जाहीर

डॉ. लीना केदारे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सुवर्णपदक जाहीर

पुणे( प्रतिनिधी) : डॉ. लीना चिंतामण केदारे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे उत्तम मराठी प्रबंधासाठी असलेले “श्रीकृष्ण केशव क्षीरसागर” सुवर्णपदक विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभात सन्मानपूर्वक दिला जाईल, असे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेच्या अंतर्गत मराठी विषयातील विद्यावाचस्पती (पीएच. डी) पदवीसाठी डॉ. लीना केदारे यांनी “१९७५ नंतरच्या स्त्रियांच्या चळवळी आणि मराठी नाटक (संजय पवार, प्रशांत दळवी आणि जयंत पवार यांच्या नाट्यलेखनाच्या विशेष संदर्भात)” प्रबंध सादर केला होता. डॉ. केदारे गेली अनेक वर्ष मुंबई येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या मराठी विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सदर विषयावर अभ्यास करताना त्यांना डॉ. राजाभाऊ भैलुमे (सहयोगी प्राध्यापक, मराठी विभाग, चांदमल ताराचंद वोरा महाविद्यालय, शिरूर, पुणे) यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. डॉ. केदारे यांच्यावर रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाच्या प्राचार्य, सहकारी प्राध्यापक, विद्यार्थी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts