ध्यास कवितेचा काव्य मंच चा अनोखा उपक्रम “एक साडी माहेरची सामाजीक जाणिवेची”

ध्यास कवितेचा काव्य मंच चा अनोखा उपक्रम “एक साडी माहेरची सामाजीक जाणिवेची”

मुंबई (प्रतिनिधी ) : ध्यास कवितेचा काव्य मंच मुंबई आयोजित महिला दिन विशेष काव्य स्पर्धा नुकतीच बोरिवलीत सायली विद्यालय बोरिवली येथे जल्लोषात पार पडली. ध्यास कवितेचा काव्य मंच कविते सोबतच नवनवीन समाजिक उपक्रम राबवत असतात. या वेळी ही एक साडी माहेरची, समाजिक जाणिवेची हा उपक्रम राबवून सहभागी कवींना वापरण्या योग्य साडी आणण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कवींनी ६५ साड्या जमा केल्या ह्या साड्या विरार येथील दारिद्र्यात खितपत पडलेल्या डोंगरी भागत काम करणाऱ्या जाणीव ह्या सामजिक संस्थेला दान करण्यात येणार आहेत.

     दरम्यान या वेळी महिला दिना निमित्त काव्य सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४५ कवींनी सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कवयित्री,डॉ. पल्लवी बनसोडे या लाभल्या होत्या. आता नवोदित कवींना भरपूर व्यासपीठ उपलब्ध आहेत, पण फक्त कवितेचा ध्यास घेऊन निरपेक्षपणे अविरत काम करणारी ध्यास करणारी ध्यास ही एकमेव संस्था आहे, अशा शब्दांत त्यांनी ध्यास परिवाराचं कौतुक केलं. कविता सादरीकरणाबद्दल त्यानी कवींना मार्गदर्शन केले व आपल्या गोड आवाजात काही कविता सादर केल्या. यावेळी सर्व कवींना सन्मानपत्र  व विजेत्यांना ताईबाई लक्ष्मण म्हात्रे सेवा ट्रस्ट पद्माकर म्हात्रे आणि बंधू यांच्या सौजन्याने आकर्षक चषक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले.

यात अनुक्रमे रेश्मा जाधव (प्रथम), विठ्ठल घाडी (द्वितीय), नीलिमा नाईक (तृतिय) तसेच मेस्लिना तुस्कानो, रवींद्र भांडे, आनंद ढाले यांना उत्तेजनार्थ
क्रमांकाने गौरविण्यात आले.

दरम्यान ध्यासचे कार्याध्यक्ष श्रीकांत पवार यांनी महिला दिनावर भाष्य करणारी कविता सादर केली तर सचिव राजेंद्र चौधरी यांनी प्रस्ताविक सादर करून काळजाला भिडणारी कविता सादर केली या वेळी उपस्थित सर्व कवींना कवी शाम माळी यांचा “आमचा आगरी दादूस” आणि कविवर्य एल.बी .पाटील यांच “आगरतल्या वाटा” हे पुस्तक भेट देऊन बुके ऐवजी बुक ही संकल्पना राबवण्यात आली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ध्यासचे अध्यक्ष कवी संदेश भोईर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सादरीकरणातील बारकावे सांगतानाच आपल्या सादरीकरणात त्या त्या वेळी भाव दिसला पाहिजे विरह, प्रेम, राग, जो भाव कवितेत आहे तो आपल्या सादरीकरणात आला पाहिजे. जर लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मला द्याल का प्लीज” असं म्हटलं असतं, तर स्वराज्य मिळालं असतं का? त्यांनी त्यावेळी तो भाव, राग प्रकट करून सिंहगर्जना केली “स्वराज्य… आणि इंग्रज सरकार खडबडून जागं झालं असंच काहीस आपल्या सादरीकरणात झालं पाहिजे.

   दरम्यान या कार्यक्रमाचं काव्यात्मक निवेदन ध्यासच्या महिला प्रमुख कवयित्री रजनी निकाळजे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ध्यासचे सदस्य स्नेहाराणी गायकवाड , श्याम माळी, संतोष मोहिते तसेच प्रसिद्धी प्रमुख गुरुदत्त वाकदेकर  यांनी विशेष मेहनत घेतली.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!