मंगळवेढ्याचे धनंजय शंकर पाटील राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित…!

मंगळवेढ्याचे धनंजय शंकर पाटील राज्यस्तरिय पुरस्काराने सन्मानित…!


मंगळवेढा (प्रतिनिधी) :  मंगळवेढा. जि.सोलापूर येथील साहित्यिक धनंजय शंकर पाटील यांच्या “दैव” कथासंग्रहास दिनांक १२ मे २०१९ रोजी “सम्राट प्रतिष्ठान” तांदुळवाडी ता. राहुरी जि. अहमदनगर यांच्यावतीने, म. फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आण्णासाहेब शिंदे सभागृहात  राज्यस्तरिय प्रथम क्रमांक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र हे या पुरस्काराचे स्वरूप होते. धनंजय पाटील यांच्या “दैव” कथासंग्रहास मिळालेला हा तिसरा राज्यस्तरिय पुरस्कार आहे. 

         या सोहळ्यास श्री. हरेश उबाळे (अर्थतज्ञ, सामाजिक विचारवंत), डाँ.श्री. संजय कळमकर (ज्येष्ठ साहित्यिक), डाँ. श्री. कैलास दौंड (विख्यात कवी), श्री.सुभाष सोनवणे (कवी व निवृत्त पोलीस अधिकारी), श्री. अरविंद शेलार ( विख्यात चित्रकार), श्री. सुनिल नाना पानसरे (कवी), आयोजक श्री. राजेंद्र पटेकर, सौ.अनिता इंगळे, साहित्यिक मनिषा गायकवाड- पटेकर आदि मान्यवर, साहित्यिक, पत्रकार, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!