Determination of inheritance rights in the fourth session of state-wide employees | Aaplaa Vyaaspith news

Friday, December 13, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनात वारसा हक्क चा निर्धार

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनात वारसा हक्क चा निर्धार

भाईंदर( प्रतिनिधी ) – मिरा भाईंदर महानगरपालिका 538 सफाई कामगार यांना वारसा हक्क मिळावा म्हणून 10 वे राज्यव्यापी अधिवेशनात गोविंद परब यांनी मांडला असता अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी अनुमोदन दिल्याने सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेख खाडे यांनी लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी गोविंद परब म्हणाले की, सफाई कामगारांना लाड / पांगे समितीच्या शिफारस लागू असताना मिरा भाईंदर मनपा मधील कामगारांना का ? मिळत नाही. भारत देश लोकशाही वर चालणारा देश आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकच कायदा आहे. मग येथील कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का ? मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील 538 सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करणे तसेच अनुकंपा करण्यासंदर्भात कायद्याने तसेच नियमाने मिळणे आवश्यक आहे. सफाई कामगार म्हणून सन 1993 पासून कर्मचारी काम करत आहेत, या कर्मचाऱ्यांना सन 2000 मध्ये लाड / पांगे समिती च्या शिफारस नुसार कायम करण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची 10 – 12 वर्षे वाया जाऊ नये म्हणून ते पूर्ण भरून काढण्यासाठी त्यांना सेवा ज्येष्ठते मध्ये त्याचा लाभ मिळावा. ज्या कर्मचाऱ्यांना सफाई कामगार मधून प्रमोशन करण्यात आले आहेत. 538 कर्मचारी पैकी 50 ते 60 कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत तर 50 कर्मचारी मयत झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आज उपास मारीची वेळ आली आहे. पण कुटुंब सेवेत येण्यासाठी हक्कदार आहेत. म्हणून राज्यव्यापी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात आला. असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या समवेत चर्चा केली. यावेळी मिरा भाईंदर कामगार सेनेचे अध्यक्ष गोविंद परब, देवानंद पाटील, वसंत पेंढारे, उल्हास आंग्रे, दत्तात्रेय जाधव, परशुराम सिंगाराम अन्य सहकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts