Chief Minister Uddhav Thackeray was greeted by Sir Richard Branson, Head of the Virgin Industry Group in Great Britain. | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘व्हर्जिन’समुहाच्या रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली सदिच्छा भेट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘व्हर्जिन’समुहाच्या रिचर्ड ब्रॅन्सन यांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्रेट ब्रिटनमधील ‘व्हर्जिन’ उद्योग समुहाचे प्रमुख सर रिचर्ड ब्रॅन्सन यांनी सदिच्छा भेट घेतली.

या भेटीत पुणे-मुंबई दरम्यान प्रस्तावित “हायपर-लूप” या प्रवासी वाहतुकीसाठीच्या वेगवान तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्पासंदर्भात तसेच हवाई वाहतूक क्षेत्राशी निगडीत चर्चा करण्यात आली. श्री.ब्रॅन्सन यांनी त्यांच्या समुहाच्या विविध प्रकल्पांबाबत माहिती दिली. भारतात विशेषतः महाराष्ट्रात त्यांच्या उद्योग समुहाला उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प निर्माण करण्यात स्वारस्य असल्याचे सांगितले. त्यामुळे निर्माण होणाऱ्या गुंतवणूक आणि रोजगार संधीची माहिती दिली.

यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, आमदार आदित्य ठाकरे तसेच ‘व्हर्जिन’ समुहाचे अधिकारी आदी उपस्थित होते. या उद्योग समुहाच्या प्रकल्पासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

साभार : महान्यूज

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts