Chief Minister Devendra Fadnavis meets Nitin Gadkari in Delhi | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आता दिल्ली ला पोहोचल्याचे आज पहावयास मिळाले . प्रथम अमित शहा यांना भेटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मातबर नेते नितीन गडकरी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली . निकाल लागूनही सत्ता स्थापन करण्यात होत असलेला उशीर लक्षात घेता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भेट घेतल्याचे बोलले जात आहे. अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा या फॉर्म्युलासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेना नेते संजय राऊत हे रोज सामनामधून आणि पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts