Chhatrapati Sambhajiraj praised Kolhapur's throne for the work of "amachi Vasai"! | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती संभाजीराजे यांनी केले “आमची वसई” च्या कार्याचे कौतुक !

कोल्हापूरच्या गादीचे छत्रपती संभाजीराजे यांनी केले “आमची वसई” च्या कार्याचे कौतुक !

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचे १३वे वंशज व कोल्हापूर गादीचे चे वर्तमान छत्रपती, राष्ट्रपती द्वारा नियुक्त कोल्हापूर चे राज्यसभा सदस्य व शिवराज्याभिषेक समितीचे प्रमुख संभाजीराजे यांनी “आमची वसई” च्या कार्याचे कौतुक केले.

आमची वसईने आत्ता पर्यंत कोल्हापूर पूरपिडीतांसाठी ४ टेंपो जीवनावश्यक सामुग्री ची मदत केली आहे. तसेच गरजूंना शैक्षणिक साहित्याची उल्लेखनीय मदत करणारी पहिली समाजसेवी संस्था आहे. समाजसेवे बरोबरच इतिहास, परंपरा व संस्कृती रक्षणासाठी तसेच जनजागृतीसाठी आमची वसई करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे असे उद्गार संभाजीराजे यांनी काढले.

आमची वसई सदस्य पराग तोडणकर, रोशनी वाघ व रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी समाजसेवेत अग्रेसर असणाऱ्या संभाजीराजेंना शैक्षणिक साहित्य देउन पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे केला व धर्मसभेतर्फे वसईची सुप्रसिद्ध सुकेळी प्रसाद म्हणून देण्यात आली.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts