पुण्यात शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

पुण्यात शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार यांचे तृप्ती देसाईंकडून कौतुक

पुणे (प्रतिनिधी) : शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून (ता. 19 जून) ‘महाराणा प्रताप व छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती वर्षातप्रित्यर्थ’ आद्यक्रांतीगुरु लहुजी साळवे मातंगशक्ती व शिवशक्ती महासंघ आणि साहित्यिक अण्णाभाऊ साठे समाजसेवी संस्था मुंबई तर्फे सांस्कृतिक महोत्सव व वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार प्रदान सोहळा-2019 आणि विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू वाटपांच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच बुधवार दि. 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन ‘अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघरराज राजेभोसले, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, प्रशांत देसाई, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका अनुराधा गोरखे, शिवसेनेचे अमित जगताप, महाराष्ट्र पत्रकार संघाचे शहराध्यक्ष कृष्णा देशमुख, महाराष्ट्र पत्रकार संघाचे प्रसिध्दी प्रमुख प्रतिक गंगणे, सामाजिक कार्यकर्ते सुधीरभाऊ नेटके आणि उपरोक्त संस्थेचे अध्यक्ष व माजी शिवसेना गटप्रमुख संतोष पवार या मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले.

याप्रसंगी शांताबाई फेम संजय लोंढे, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातून पवन सुर्यवंशी, क्रिडा क्षेत्रातून अशोक उमापे, कोरीओग्राफर प्रतिक चिंदरकर, आरोग्य क्षेत्रातून न्यूरोलॉजिस्ट सर्जन डॉ. अमित वाघ, अभिनय क्षेत्रातून अभिनेता सुभाष यादव, अभिनेत्री ऐश्वर्या काळे, यांना यावेळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी गरीब, गरजू, गुणवंत अशा विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप महाराष्ट्र पत्रकार संघाचे पुणे शहराध्यक्ष कृष्णा देशमुख, व्यंकटेश इंटरप्रायझेसचे अमोल लांडगे, संजय पाटोळे बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक सुनील मते, शिवसेनेचे अमित जगताप, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुधीरभाऊ नेटके, शिवाजीनगरचे घनश्याम निम्हण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या सांस्कृतिक महोत्सवात प्रतिक डान्स अ‍ॅकॅडमीच्या बाल कलाकारांनी नृत्य सादर केले. त्याचबरोबर नृत्य सादरीकरणाबरोबरच सामाजिक संदेश देण्यात आले तर पार्श्वगायिका अनिता चंद्रकांत इंगवले यांनी पुरूषांच्या आवाजात गाणे गाऊन तर झी युवा संगीत सम्राट फेम ओंकार चंद्रकांत इंगवले याने त्याच्या ढोलकीने उपस्थित पाहुण्यांना व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमास विशेषता महिलांची व विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. मोठ्या संख्येने शिवसैनिक व समाजबांधव उपस्थित होते.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई बोलताना म्हणाल्या, या कार्यक्रमाचे आयोजक माजी शिवसेना गटप्रमुख संतोष पवार व निमंत्रक शिवसेना शाखा क्रमांक 17 चे उपशाखाप्रमुख संजयजी पवार यांचे मनापासून कौतुक करते. संतोष पवार यांचा आज वाढदिवस आहे, परंतू स्वत:चा वाढदिवस साजरा न करता आपल्या शिवसेना पक्षाचा वर्धापनदिन, महापुरूषांची संयुक्त जयंती त्याचबरोबर वंदनीय हिंदू हृद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे पुरस्कार व गरजूंना शालोपयोगी वस्तू वाटप आणि वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले हेच फार कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी पहिल्यांदाच शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा होत आहे असे मला वाटते.

हा कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी संस्थेचे गणेश आदमाने, प्रजापती सूर्यवंशी, प्रथमेश नेटके, पोर्णिमा जगधने, शंकर खंदारे, विशाल साळुंखे, सचिन कांबळे यांनी, चित्रपट निर्माते संजय देवकर, फोटोग्राफर विकास कस्तुरी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे निमंत्रक शिवसेना शाखा क्रमांक 17 मुंबईचे उपशाखाप्रमुख संजय पवार होते. सूत्रसंचालन दिपक साबळे व चित्रसेन भोर यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन व प्रास्ताविक उपरोक्स संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिवसेना गटप्रमुख संतोष पवार यांनी केले.

संतोष पवार यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो आगळा-वेगळा आहे. ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांचे मनापासून अभिनंदन. स्वत:चा वाढदिवस साजरा न करता आपल्या पक्षाचा वर्धापनदिन त्यांनी साजरा करण्याचे ठरविले हे खरच कौतुक करण्याजोगे आहे.

– तृप्ती देसाई, संस्थापिका भूमाता ब्रिगेड

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!