Breaking News

कॅरेटलेनने केले 50 व्या स्टोअरचे उदघाटन!

कॅरेटलेनने केले  50 व्या स्टोअरचे उदघाटन!

मुंबई (प्रतिनिधी) : कॅरेटलेन – ए तनिष्क पार्टनरशिप, भारतातील अग्रगण्य ओमनी-चॅनल ज्वेलरने आज मुंबईतील सर्वात मोठे स्टोअर लॉन्च केला आहे. आजमितीला स्टोअरची संख्या राष्ट्रीय पातळीवर ५० झाली आहे. अंधेरी (पश्चिम), लिंक रोड येथे आधुनिक महिलांसाठी विशिष्ट आभूषण खरेदीचा अनुभव मिळावा यासाठी नवीन स्टोअरची निर्मिती केली आहे.
या प्रसंगी बोलताना कॅरेटलेनचे संस्थापक आणि सीईओ मिथुन सचेती म्हणाले, “आम्ही २०१२ मध्ये आमचा पहिला स्टोअर लॉन्च केला आणि त्यानंतर आम्ही ग्राहकांची गरजा आणि मागणी पूर्ण करण्यासाठी वेगाने विस्तार करीत आहोत. पश्चिम विभाग नेहमी आमच्यासाठी एक महत्त्वाची बाजारपेठ राहिले आहे आणि आम्ही मुंबईच्या प्राथमिक उपनगरातील आमच्या ५० व्या स्टोअरची सुरूवात केल्याने आम्ही खूप उत्सुक आहोत. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक संपूर्ण नवीन अनुभवजन्य स्टोअर डिझाइन केले आहे जे त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशे आभूषण शोधण्यास मदत करेल. ‘जस्ट लुकिंग’ क्षणांसाठी स्टोअरमध्ये व्हर्च्युअल ट्राय-ऑन ‘मॅजिक मिरर’ आहे. स्टोअर मध्ये सुंदर आणि परवडणारी दागदागिने अधिक सुलभपणे मिळवून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”


स्टोअर मध्ये स्त्री’चे दोन जग दर्शविणाऱ्या मध्य भिंतीवर सौम्य हाताने-चित्रित आर्टवर्कद्वारे एक अद्वितीय पेंटिंग आहे, ज्यामध्ये बाह्य रंग समाजाचे व कुटुंबाचे प्रतिनिधित्व करतात जे आजच्या महिलेसाठी महत्वाचे आहे. तसेच सौम्य कॅरेटलेन सुद्धा रंगांमध्ये स्त्रीच्या प्रति सद्भावना दर्शविते.
५० व्या स्टोअरचे लाँच आमच्यासाठी एक महत्वाचा प्रसंग आहे आणि आमच्या ग्राहकांसाठी खास लाँच ऑफर म्हणून, मर्यादित कालावधीसाठी हिऱ्याच्या दागिन्यांवर ३०% सूट देत आहोत.असे सागर व्ही, हेड-रीटेल विक्री, कॅरेटलेन यांनी सांगितले.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!