BJP leaders lead in dumping of banks: Sachin Sawant | Aaplaa Vyaaspith news

Saturday, October 19, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

बँकांना डुबवण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आघाडीवर!: सचिन सावंत

बँकांना डुबवण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आघाडीवर!: सचिन सावंत

मुंबई (प्रतिनिधी) : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना डुबवण्यात भारतीय जनता पक्षाचे नेते आघाडीवर आहेत. या यादीत आता मुंबई भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष मोहित भारतीय (कंबोज) यांचेही नाव आले आहे. भाजप सरकारच्या पाठबळामुळेच बँकांना लुटण्याचे प्रकार वाढत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

सावंत पुढे म्हणाले की, बँकांचा म्हणजेच जनतेचा पैसा लुबाडण्याचे प्रकार भाजप सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत, हे रिझर्व्ह बँकेनेही स्पष्ट केले आहे. यात भाजप नेत्यांचा सहभाग उघड झाला आहे. याआधी भाजपाच्या खासदार पूनम महाजन या विलफुल डिफॉल्टर असल्याचे उघड झाले आहे. कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही वन टाईम सेटलमेंटचा फायदा घेऊन बँकांना चुना लावला. यातही भाजप सरकारची छत्रछाया त्यांच्या कामी आली. आता कंबोज यांनीही बँक ऑफ बडोदाला डुबवले आहे. बँकांना डुबवून उजळ माथ्याने फिरणे हे सरकारच्या छत्रछायेशिवाय शक्य नाही, असा आरोप सावंत यांनी केला आहे.

मोहित भारतीय (कंबोज) हे हेतूपुरस्सर कसुरदार थकबाकीदार(विलफुल डिफॉल्टर) असल्याची जाहीरात बँक ऑफ बडोदाने वर्तमानपत्रात दिली आहे. अशा सर्व थकबाकीदारांवर कठोर कारवाई करुन जनतेचा पैसा पुन्हा बँकेत परत आला पाहिजे यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत, अशी मागणी सावंत यांनी केली आहे. भाजप सरकारकडे लोकांना तोंड दाखवायला जागा नसल्याने निवडक कार्ट्यांवर कारवाई करत असल्याचा देखावा करून आपल्या बाब्यांना मात्र वाचवत आहेत.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts