BJP government at center and state is not ready to adopt public-oriented policy: Dr Manmohan Singh | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

केंद्र आणि राज्यातील भाजप सररकार लोकाभिमुख धोरण स्वीकार करायला तयार नाहीः डॉ मनमोहन सिंग

केंद्र आणि राज्यातील भाजप सररकार लोकाभिमुख धोरण स्वीकार करायला तयार नाहीः डॉ मनमोहन सिंग

पंतप्रधान, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पीएमसी बँकेच्या खातेधारकांना दिलासा देण्यासाठी पाऊले उचलावीत

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रातील अणि राज्यातील भाजप सरकार लोकाभिमुख धोरण स्वीकार करायला तयार नाही. त्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था अत्यंत वाईट परिस्थितीतून जात आहे. याचा परिणाम सम्पूर्ण उद्योगधंदे, इंडस्ट्री अणि व्यवसायावर होत आहे. बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. मह्राराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे बंद पडले. एकेकाळी महाराष्ट्र गुंतवणूक करण्यासाठी अग्रेसर होता. मात्र आता आर्थिक मंदीमूळे वाहन उद्योग उध्वस्त झाला आहे.  मागील पाच वर्षात महाराष्ट्रातील अनेक कारखाने बंद झाले. पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपुर अणि अमरावती या ठिकाणी हीच परिस्थिति आहे. त्यामुळे केमिकल, खते, इलेक्ट्रॉनिक, वाहन उद्योग या क्षेत्रातील सर्व व्यावसायिक चीनकडून वस्तू आयात करत आहेत. त्यामुळे चीनकडून आयात १,२२,००० कोटी एवढी वाढली आहे. चीनला याचा खुप फायदा होत आहे. भाजप सरकारच्या उदासीनतेमुळे अणि असमर्थतेमुळे ही परिस्थिति ओढवली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अर्थतज्ञ व माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी केले आहे.

आज डॉ मनमोहन सिंग मुंबईतील एमसीए येथे मुंबई काँग्रेस आयोजित Words of Wisdom on Indian Economy या विषयावर बोलायला आले होते. त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढ़ले. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे व अविनाश पांडे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, उपाध्यक्ष चरण सिंग सप्रा, एआयसीसी प्रवक्ते जयवीर शेरगिल, माजी आमदार सुरेश शेट्टी उपस्थित होते.

डॉ मनमोहन सिंग पुढे म्हणाले की चुकीच्या आर्थिक धोरणामुळे आर्थिक क्षेत्रात भाजप सरकार फेल झालेली आहे. बेरोजगारिने तरुण बेहाल झालेले आहेत. आज ४ पैकी ३ युवक बेरोजगार आहेत. भविष्यात याचा खुप वाईट परिणाम होणार आहे. बीजेपीने आर्थिक विकासासाठी तयार केलेले डबल इंजिन मॉडेल फेल गेलेले आहे. अशा पद्धतीने बीजेपी बोलते त्याप्रमाणे २०२४ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोह्चु शकत नाही. आपला जीडीपी दर ५ ते ६ टक्के आहे परन्तु भारताचा आर्थिक विकास ८ ते १० टक्के जीडीपी दर असेल तरच होऊ शकतो.

पीएमसी बँक विषयावर डॉ मनमोहन सिंग म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री निर्मला सीतारामन अणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस व आरबीआय गवर्नर यांनी पीएमसी बँक समस्येवर गंभीर होऊन लक्ष घातले पाहिजे अणि चर्चा केली पाहिजे. तसेच ताबडतोब चर्चा करून पीएमसी बँकेच्या १६ लाख खातेधारकांसाठी रिवाइवल पैकेज जाहिर केले पाहिजे. काँग्रेस पीएमसी खाते धारकान्च्या पाठीशी उभी आहे अणि नोव्हेंबर मध्ये होणार्या संसदेच्या सत्रामध्ये काँग्रेस पीएमसी बँकेचा मुद्दा उचलणार आहे अणि सर्व खाते धारकांची रक्कम सुरक्षित होणारे विधेयक संसदेत मंजूर करून घेणार आहे. मी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या कडे मागणी करतो की पीएमसी बँकेच्या खाते धारकाना जो कोणी आजारी असेल, किडनी समस्या किंवा मोठी शस्त्रक्रिया असेल त्यांना PM National Medical Policy अंतर्गत त्वरित मदत करावी.

या कार्यक्रमाला आमदार भाई जगताप, खासदार हुसेन दलवाई, माजी खासदार भालचंद्र मूणगेकर, मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष वीरेन्द्र बक्षी व भवर सिंग राजपूत, सरचिटनीस भूषण पाटिल व संदेश कोंडविलकर सहित अनेक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अणि पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts