
नवी मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील पूरग्रस्त बंधू भगिनींना मदत करुन त्यांच्या जीवनातील हरवलेले सूर पुन्हा एकदा जुळण्यासाठी लोकनेते गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक रुपेश किसन गायकवाड यांनी स्थानिक जनतेला आणि मित्र परिवारास पुरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आवाहनाला सर्व नागरिकांनी माणुसकीच्या नात्याने उत्तम प्रतिसाद देत सढळ हाताने शक्य ती मदत केली.
नागरिकांनी व मित्रपरिवार यांनी मोठ्या प्रमाणावर कपडे,बिस्किटे,पाणी,धान्य,औषधे व इतर सर्व मदत रुपेश गायकवाड यांच्या जुईनगर येथील जनसंपर्क कार्यलयात जमा केली. बुधवार दिनांक १४ ऑगस्ट रोजी सर्व जमा झालेल्या वस्तू ट्रक मध्ये भरून मदत संकलन केंद्र -विधानभवन पुणे येथे जिल्हाधिकारी भालेराव साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आल्या.
अथर्व फाउंडेशनचे सचिव दिनेश बांगर ,उपअध्यक्ष सूर्यकांत फावडे, खजिनदार राजेंद्र फावडे,राजेश कुटे, शुभम जाधव, विशाल जाधव,शंकर गोडसे, अजित साळुंखे, निलेश जाधव, अक्षय साळुंखे, विकास बेहरे, अक्षय जाधव,विक्रम दांगट, दिलीप दांगट ,राहुल दांगट, सागर दांगट,राजू दांगट, के चौरसिया शिवाजी साळुंखे,बाळकृष्ण धडेल, नलावडे, शरद वॉरंग,अंकुश कदम, विनायक माने, शिंदे, गोरडे,दीपक जाधव ,कुंभार, मालवणकर, कचरे, संभाजी कदम,रामकृष्ण तिवारी,प्रवीण वाघमारे, निर्मल, सुमीत, निवृत्ती, महेंद्र,विलास जगताप, राजेंद्र पवार,तसेच उद्योजक निलेश विश्वासराव आणि त्यांची टीम, उद्योजक विजय ताम्हाणे ,सोपान जाधव, अमोल, दत्ताशेठ, गोविंद वाळुंज,बाळू जरे, तुर्भे ट्रॅफिक विभाग,जय शिवराय फंड ,जुईनगर महिला मंडळ, युवा मित्र मंडळ ,गणराज मित्र मंडळ या सर्वांनी खूप मेहनत आणि विशेष सहकार्य केले.