'Antarayi: Tendulkar Bhagale Today' | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

रंगभूमीदिननिमित्त ‘अंतराय : तेंडुलकर भागीले आज’

रंगभूमीदिननिमित्त ‘अंतराय : तेंडुलकर भागीले आज’

अजेय नाट्यसंस्था रंगभूमीदिननिमित्त सविनय सादर करीत आहे

ठाणे(प्रतिनिधी) : ‘अंतराय : तेंडुलकर भागीले आज’. मराठी नाटकांना आंतरराष्ट्रीय ओळख विजय तेंडुलकर यांच्या नाटकांनी मिळवून दिली. त्यांच्या पात्रांमध्ये माणसाच्या मनाचं मानसिक विश्लेषण बारकाईने येतं आणि माणसावर असणारी नियतीची पकड ते अधिक स्पष्ट करत जातं. नियतीचं माणसाच्या आयुष्यातले स्थान लक्षात येतं. आज नियतीचं स्थान माणसाच्या आयुष्यात काय आहे, हिंसेचे स्थान काय आहे, अनेक पर्याय उपलब्ध असताना ह्या गोष्टी कश्या आकार घेतात, अशा संकल्पनेवर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ही मूळ संकल्पना लेखक दिग्दर्शक डॉ. क्षितिज कुलकर्णी ह्यांची. ते स्वतः व अजेय टीमचे कार्यकर्ते ह्या कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. अस्मिता चौधरी व वर्षा जोशी ह्या सहआयोजक आहेत. हा कार्यक्रम दि. १० नोव्हेंबर २०१९ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालय स्टेशन रोड, जिल्हा परिषद कार्यलयासमोर, ठाणे पश्चिम येथे संध्याकाळी ५:३० ते ७:४५ या वेळेत पार पडणार आहे.
तेंडुलकरांच्या गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे, कमला, नियतीच्या बैलाला, सखाराम बाईंडर या नाटकांमधले प्रवेश,
आजच्या काळातलं चित्र स्पष्ट करणारे, मांडणारे लेख व त्यांचे अभिवाचन, कविता वाचन, आशा स्वरूपातून ‘तेंडुलकर भागीले आज’ ही संकल्पना उलगडत जाणार आहे. हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना विनामूल्य आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क – ९९३०१७५५२७, ९०८२२६९५३८

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts