Breaking News

रेडक्लिफ स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न

रेडक्लिफ स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न

नवी मुंबई (प्रतिनिधी) –  उलवे येथील रेडक्लिफ स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृह येथे बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून नुकताच संपन्न झाला. यावेळी रेडक्लिफ शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य, गायन असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.  सांस्कृतिक कार्यक्रमातील विजेत्या विद्यार्थ्यांना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी रेडक्लिफ स्कुलच्या मुख्याध्यापिका अंशू सक्सेना, अब्दुल हमीद खान, संदीप गाला, रोहित चौधरी, स्वाती मुखर्जी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षकवृंद व पालकवर्ग उपस्थित होते.

यावेळी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, स्नेह संमेलनाचे आकर्षण सगळ्यांनाच असते, लहान वयापासून मोठ्यापर्यंत स्नेहसंमेलन भरत असतात परंतु शाळा व कॉलेजचे स्नेहसंमेलन नेहमी आठवणीत राहतात. आज या रेडक्लीफ शाळेच्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करताना पाहून आनंद वाटत आहे. उलवे येथील रेडक्लिफ शाळा सुरु होऊन केवळ 3 वर्षे झाले असताना या विद्यार्थ्यांना घडविण्यात मोलाचे कार्य केलेल्या शिक्षकांचेही कौतुककरावे तेवढे थोडे असल्याचेही त्यांनी सांगितले. या शाळेच्या पहिल्या वर्षापासून आम्ही चांगले विद्यार्थी घडताना पाहत आहोत. विद्यार्थ्यांना कमीत कमी फी मध्ये चांगले उच्च शिक्षण मिळावे हाच रेडक्लिफ सारख्या शाळेचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना किंवा शाळेच्या व्यवस्थापनाला  कोणत्याही स्वरुपात गरज भासली तर त्या करिता मी तत्पर ठामपणे आपल्या पाठीशी उभी राहणार असल्याचे मत व्यक्त करत लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत उपस्थित विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!