Allotment of Sarees to Women Police personnel, Navi Mumbai MNS's unique initiative | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मनसेकडून साड्या वाटप, नवी मुंबई मनसेचा अनोखा उपक्रम

महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मनसेकडून साड्या वाटप, नवी मुंबई मनसेचा अनोखा उपक्रम

मनसे सानपाडा – पामबीच विभागाचा अनोखा उपक्रम

नवी मुंबई(प्रतिनिधी) : दिवाळी सणाच्या काळातही कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून प्रमाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या सानपाडा पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सानपाडा – पामबीच विभागाकडून दिवाळीनिमित्त भेट म्हणून मंगळवारी साड्या वाटप करण्यात आल्या.

सानपाडा गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ मढवी यांच्या हस्ते महिला पोलीस कर्मचाऱ्यांना साड्या वाटप करून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. दिवाळीच्या आनंदी पर्वात महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याच्या सामाजिक जाणिवेतून मनसेने आयोजित केलेल्या या अनोखा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र पिल्ले, मनसेचे कार्यकर्ते नितीन पाटील, विवेक कदम हे उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts