ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा – शब्बीर अन्सारी

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा – शब्बीर अन्सारी

मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा महाआघाडी ला जाहीर पाठिंबा असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी घोषित केले आहे.

यावेळी अन्सारी म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्र पक्षाला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचा जाहीर पाठिंबा आम्ही दिला असून आमची प्रदेश कार्यकारणी, जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी पूर्ण ताकतीने काम करणार आहे असे सांगितले. गेल्या 50 वर्षांपासून आम्ही मुस्लिम समाजासाठी काम करतोय. युतीचे सरकार आम्ही पाहिले पण आताचे युती सरकार हे अतिशय वाईट राजकारण करत आहे. ओबीसी समाजासाठी फक्त घोषणा करून घोर फसवणूक केली असल्याचे अन्सारी यांनी स्पष्ट केले. लाखो युवक बेरोजगार झाले आहेत. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा नोकऱ्या मिळत नाही आहेत. याला जवाबदार कोण ? असा सवाल अन्सारी यांनी उपस्थित केला. राज्यातील भाजप-शिवसेना सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड अस्वस्थता आहे. निवडणुकीपूर्वी भारंभार आश्वासने देत हे दोन्ही पक्ष सत्तेत आले. पण बहुतांशी आश्वासनांची पूर्तता झालेलीच नाहीत. देवेंद्र फडणवीस सरकार मधील मंत्र्यांकडे मुस्लिम ओबीसी समाजासाठी वेळ मिळत नाही. मग हे सरकार हवं आहे तरी कशाला ? असा गंभीर प्रश्न अन्सारी यांनी उपस्थित केला.

यावेळी काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष गुफरान अन्सारी, राष्ट्रीय प्रवक्ते मिरझा अब्दुल कय्युम नदवी, प्रदेशाध्यक्ष मुसा मुर्षद, महाराष्ट्र युवा सचिव वसीम अन्सारी, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!