बांधकाम क्षेत्रातील धडाडीची महिला

बांधकाम क्षेत्रातील धडाडीची महिला

बांधकाम क्षेत्र हे तद्दन पुरुषांची मक्तेदारी असलेलं क्षेत्र मानलं जातं. मात्र या क्षेत्रात आपले पाय भक्कमपणे रोवून कार्यसम्राट असलेली एक धाडसी महिला सुद्धा आहे. तीच नाव आहे मंजू याग्निक. बांधकाम क्षेत्रात अग्रणी असलेल्या नाहर समूहात व्हाईस चेअरपर्सन आहे. या समूहाचे सर्वेसर्वा सुखराज नाहर यांची स्वप्ने आणि मंजू याग्निक यांचे कठोर परिश्रम यांनी हा समूह आज अग्रेसर आहे. विशेष म्हणजे ग्रॅज्युएट होताच मंजूने हे क्षेत्र निवडले. अन या समूहात दाखल होऊन एकामागून एक पदे मिळवत तीने सर्वोच्च पद गाठले आहे. गेली २० वर्षे तीन या रुक्ष व्यवसायात जातीनं लक्ष घालून मोठी भरारी मारली आहे.
जमीन संपादन, जमिनीचे व्यवहार, बांधकामाचा आराखडा, बांधकामाची आखणी व नियोजन, जागेचे सुशोभीकरण, घरांची अंतर्गत सजावट, विविध कंत्राटदारांवर नियंत्रण आणि विक्री अशा सर्वच पातळींवर मंजू यांचे वर्चस्व असल्याचे दिसून येते. आपले प्रकल्प अगदी नामांकित व आंतराष्ट्रीय पातळीवरचे असावेत, याकडे त्यांचा कटाक्ष असतो. त्यामुळेच मुंबईचा एकमेव हरितपट्टा म्हणून त्यांचा प्रकल्प उभा आहे. जवळपास एक नगरी उभारली जात आहे. त्यात अत्याधुनिक घरे असतील.
त्यांच्या या कर्तबगारीचा वेळोवेळी सन्मान झालेला आहे. वुमन इंटरप्रिनियर अवॉर्ड, फिमेल रियाल इस्टेट प्रोफेशनल अवॉर्ड, कन्स्ट्रक्शन वुमन ऑफ द ईयर अवॉर्ड अशा अनेक पारितोषिकांनी त्यांचा गौरव झाला आहे. काँक्रीटच्या रुक्ष वातावरणात काम करीत असल्या तरी मंजु मॅडम सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात आवर्जून सहभाग घेतात. त्या राज्यस्तरीय हॉकी खेळाडू राहिल्या आहेत. रायफल शूटिंगमध्ये त्यांना विशेष रुची आहे. त्या नियमित सर्व करतात. इतकंच नव्हे त्या चक्क विमान देखील चालवतात. त्यांच्याकडे फ्लायिंग लायसन्स आहे. त्यांनी आपल्या करिअरमधील घेतलेली हि भरारी नक्कीच प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे.

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!