ti fuldani | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

ती फुलदाणी

ती फुलदाणी

कमनीय कमर
नजाकत अदबशीर
विसावती सुमने हृदयस्थ
सुखावते नजर प्रसन्न ते घर !

अशी ही फुलदाणी वास्तुचे सौंदर्य तर वाढवतेच पण मन प्रसन्न करते.
 रंगबिरंगी शोभिवंत फुले त्यांचा सुगंधी दरवळ, सर्वांच्या कौतुकमिश्रीत नजरा झेलत दिमाखात उभी असते.

मग ती घराच्या हॉलमध्ये, बेडरुममध्ये ,
हॉटेल,राजवाडे अशा ठिकाणी आपले वैभव मिरवत असते.
पण म्हणतात ना,
“जया अंगी मोठेपण
तया यातना कठिण”।
पण दुर्दैव तिचे, एक अभिशाप आहे तिला.
कुणालाही आला राग की फेकली फुलदाणी.
काचेची असेल तर त्याक्षणीच चक्काचूर
आणि धातूची असली तर कपाळमोक्ष ठरलेला.
नवरा बायकोच्या भांडणात तर तिचीच आहुती.
यात त्या बिचारीचा तरी काय दोष.
वड्याचे तेल वांग्यावर निघते हे मात्र खरे.
बायकांना मात्र एक चांगलं शस्त्र म्हणून नेहमीच उपयोगी पडते.
कुणी अन्य व्यक्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करु लागली वा अचानक घरात शिरली तर हीच फुलदाणी तिला वरदान ठरते, हा सीन पिक्चरमध्ये तर हमखास असतोच असतो.
पण शेवटी हकनाक तिचाच बळी जातो.
कधी कधी लहान मुलांच्या बाललीला पहात तिने रमून जावे तर तिच आऊट होऊन फरशीवर आपटते.
नेहमी सुखदुःखाची साक्षीदार असलेली अशी ही सहनशील सहिष्णु,सौंदर्यवती विरांगना आत्मसमर्पणाला सदैव तत्पर असते.
तिला त्रिवार सलाम.

@ सुनिला मोहनदास

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts