thigal natyanche | Aaplaa Vyaaspith news

Sunday, November 17, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

ठिगळ नात्यांचे ………

ठिगळ नात्यांचे ………

आमच्या कॉम्प्लेक्स च्या खाली असलेल्या एका शॉप च्या बाहेर हुसेन चाचा बसतात कपड्यांना रफ़ू करायचा त्यांचा व्यवसाय आहे. छोटेखानी उद्योग आहे तो त्यांचा सेवा निवृत्त झाल्या वर अचानक त्यांच्या मुलाला आणि सुनेला त्यांची अडचण वाटू लागली आणि एक दिवस त्यांचा मुलगा आणि सून कायमचे दुबईला निघून गेले……..
१ वर्ष मुलाने अजिबात वडिलांची खबर घेतली नाही त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले शेजारी पाजारी तरी किती मदत करणार म्हणून मग त्यांनी स्वतःच्या अंगभूत कलेला आपला व्यवसाय बनवायचं ठरवलं. कपड्यांना रफ़ू करण्याचे,कपडे अल्टर करण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्यांच्या बायकोची शिलाईची मशीन होती ती उपयोगात आणत त्यांनी दुकानदाराशी रोजच्या भाड्याचा सौदा करून आपला रोजगार चालू केला . बघता बघता त्यांच्या कडचं काम वाढू लागलं,आता तर त्यांना उसंत नसते . एखादा चांगला कारागीर मिळाला की ते दुसरी मशीन टाकणार आहेत. अधून मधून माझं जाणं होत असतं त्यांच्या दुकानात … गेले ४/५ दिवस दिसले नाहीत म्हणून काल सहज चौकशी केली तेव्हा समजलं की ते आजारी आहेत आणि त्यांच्या बद्दल ही माहिती समजून आली. आज ऑफिस ला येताना ते दुकानात दिसले म्हणून त्यांची चौकशी केली तेव्हा चाचा म्हणाले बेटी मै कपडे को रफ़ू करके ठीक कर देता हूँ काश रिश्ते भी रफ़ू कर शकता …… सदऱ्याच्या बाहीने डोळे पुसत चाचा पुन्हा कामाला लागले…
मन सुन्न झालं इतका ही आपलेपणा चां ओलावा का नात्यात निर्माण होतं नाही…पुढच्या पिढीला घडवायला आजची पिढी कुठे कमी पडते आहे का?हे शुष्क नातं का तयार होतं?नेमकी चूक कुठे घडतेय जबाबदारीची जाणीव करून द्यायला,कर्तव्य काय आहेत हे शिकवायला,जाणीव करून द्यायला तर कमी पडत नसावी ना?एक ना अनेक प्रश्न त्यावेळी मनात उभे राहिले.
खरंच नात्यांना रफ़ू करता किंवा अल्टर करता आलं असतं सहजपणे तर किती तरी नाती संपायच्या आधीच पुन्हा नव्याने तग धरून नवा श्वास घेतील . रफ़ू असं करता आलं पाहिजे की समजून ही आलं नाही पाहिजे . ती पण एक कलाच आहे म्हणा ……… बस जमून आली पाहिजे किंवा शिकली तरी पाहिजे ही नात्यांना रफ़ू करण्याची कला ……… आकाशचं फाटलं तिथे कुठे कुठे ठिगळ लावणार हे म्हणायची पाळी कोणत्याही नात्यात ,मैत्रीत येऊ नये . मी देवा जवळ प्रार्थना केली की चाचां चा मुलगा परत येवो आणि त्यांना सोबत घेऊन जावो.
@ मनीषा जाधव वाघे (पनवेल,कामोठे)

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts