The song was hearty | Aaplaa Vyaaspith news

Friday, August 23, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

गाणं मनातलं

गाणं मनातलं
“ताज महाल” नावाचा एक नितांत सुंदर चित्रपट सन १९६३ रोजी प्रदर्शित झाला.  १९६४ सालच्या “फिल्म फेअर पुरस्कार” सोहळ्यात “उत्कृष्ठ गीत लेखन, उत्कृष्ठ संगीत व उत्कृष्ठ पार्श्व् गायक/गायिका” अशा तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आपल्या अविस्मरणीय चालींनी जनमानसावर राज्य केलेल्या संगीतकार रोशन यांनी या चित्रपटातील गीतांना अवीट चाली देऊन कानसेनांना तृप्त केले आहे.  प्रदीप कुमार (शहजादा) व बीना राय (अर्जुमंद बानू) ही हिट जोडी असूनही यातील सर्वच गीतांनी या चित्रपटाला फार उच्च स्थानावर नेऊन ठेवले आहे.  यातील सगळीच गाणी श्रवणीय आहेत.  त्यातल्या त्यात मुहम्मद रफी व लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेले द्वंद्व गीत “जो वादा किया वो निभाना पडेगा” हे गाणे म्हणजे रोशन यांच्या मधुर संगीताने नटलेल्या अनेक सुंदर गाण्यांपैकी एक आहे असे म्हटले तर योग्य ठरेल.  प्रेम गीते लिहिण्यात हातखंडा असणाऱ्या साहिर लुधियानवी यांनी शब्दबद्ध केलेले हे गीत “पहाडी” रागातील “कहेरवा” तालात आहे.  हे गाणे म्हणजे प्रत्येक प्रियकर प्रेयसीला आपले प्रेम सिद्ध करण्यासाठी नक्कीच प्रेरणादायक ठरेल.  प्रेमाचा पहिला टप्पा म्हणजे एकमेकांवर असलेला अतूट विश्वास आणि त्याच विश्वासाचे वर्णन कवीने फार सुंदर शब्दात केले आहे.
जो वादा किया वो निधान पडेगा रोके जमाना चाहे रोके खुदाई तुमको आना पडेगा
तरसती निगाहों ने आवाज दी है
मोहब्बत की राहों ने आवाज दी हैं
जान-ए-हया जान-ए-अदा छोडो तरसाना
तुमको आना पडेगा
ये माना हमे जा से जाना पडेगा
पर ये समझ लो तुम ने जब भी पुकारा हमको आना पडेगा
उत्कट प्रेमाने वाट पाहणाऱ्या नजरेने तुला साद दिली आहे त्याकरिता तरी लाजून नखरेल अदांनी मला घायाळ करणे सोडून तुला यावे लागेल  या सादेला तेव्हढ्याच समरसतेने प्रतिसाद देतांना प्रेमिका म्हणते तू प्रेमाने साद दिल्यावर प्रतिसाद देऊन मला यावेच लागेल.
हम अपनी वफा पे ना इल्जाम लेंगे
तुम्हे दिल दिया है, तुम्हे जान भी देंगे
जब इष्क का सौदा किया, फिर क्या घबराना, हम को आना पडेगा
मी हृदय दिले आहे, माझे आयुष्य ही तुम्हाला दिले आहे. आपण दोघेही एकमेकांच्या प्रेम बंधनात आहोत तर जगाला घाबरायचे कशाला.  मला तर यावेच लागेल.
चमकते हैं जब तक ये चाँद और तारे
ना टूटेंगे अब एहद-ओ-पैमां हमारे
एक दुसरा जब दे सदा, हो के दिवाना हम को आना पडेगा
प्रियकर प्रेयसी अशी शपथ घेतात की जोपर्यंत आकाशात चंद्र चांदण्या आहेत तोपर्यंत आम्ही एकमेकांना दिलेल्या / घेतलेल्या आणा-भाका यावर आम्ही दृढ राहू. आम्ही परस्परांना दिलेल्या वचनांचे पालन करू व त्याला आम्ही बांधील राहू.
@ मिलिंद कल्याणकर
नेरुळ, नवी मुंबई
छायाचित्र : google images

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!