Modernization of social, connectivity and commercial-led infrastructure is promoting Thane's domestic market. | Aaplaa Vyaaspith news

Monday, October 21, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

सोशल, कनेक्टिव्हिटी आणि कमर्शियल नेतृत्वाखालील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण देत आहे ठाण्याच्या घरगुती बाजाराला चालना

सोशल, कनेक्टिव्हिटी आणि कमर्शियल नेतृत्वाखालील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण देत आहे ठाण्याच्या घरगुती बाजाराला चालना

गेल्या काही वर्षांत, ठाणे आपल्या भौतिक पायाभूत सुविधांच्या आणि सामाजिक सुविधांच्या पार्श्वभूमीवर त्याच्या गुणवत्तापूर्वक निवासी विकासासाठी लोकप्रियता प्राप्त करीत आहे. घोडबंदर रोड पूर्वी आणि पश्चिमी एक्सप्रेस महामार्गांना जोडणारा धनाढ्य रस्ता म्हणून विकसित झाला आहे. नौपाडा, पंचपखाडी सह इस्टर्न एक्स्प्रेस हायवे (ईईएच) आणि पोखरण रोड नं. २ यासारख्या परिसरातील रहिवासी मालमत्ता प्रसिद्ध असून उर्वरित बाजार पेठेच्या तुलनेत जास्त किमतीची मागणी करते.

मुंबईतील नरीमन पॉइंट, लोअर परेल आणि बीकेसीसारख्या अनेक व्यावसायिक केंद्रांनी सॅच्युरेशन पॉईंट गाठला असल्याने ठाणेला व्यवहार्य पर्याय म्हणून पाहिले जात आहे, कारण अनेक आयटी / आयटीइएस कंपन्या त्यांचे कार्यालय तेथे उघडत आहेत. यामुळे कार्यरत व्यावसायिकांना देखील निवासी पर्याय म्हणून या परिसरावर विचार करण्यास उद्युक्त केले आहे.

हे क्षेत्र पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी पसंतीचे स्थान बनत आहे, कारण भांडवलाचे मूल्य मुंबईपेक्षा खूपच कमी असून घोडबंदरमध्ये रु. ६,००० ते रु. १०,००० प्रति स्क्वेअर फूट (स्त्रोत: नाइट फ्रँक रिसर्च) तर नौपाडामध्ये रु. १४, ००० ते रु. १८,००० प्रति स्क्वेअर फूट (स्रोत: नाइट फ्रँक रिसर्च) या श्रेणीमध्ये अपार्टमेंट्स उपलब्ध आहेत. २०१८ मध्ये या ठिकाण्याने ९, ८०० पेक्षा अधिक युनिट्सचे लॉन्च  पहिले आहे ज्यात कल्पतरू, हिरानंदानी आणि वाधवा यासारख्या प्रख्यात रिअल इस्टेट कंपन्यांच्या प्रकल्पांचा समावेश देखील आहे. प्रीमियम लाइफस्टाइल अर्पण करत नवीन विकास क्लब हाउस, स्विमिंग पूल, हेल्थकेअर आणि मनोरंजन या सारख्या सामाजिक सुविधांसह सज्ज आहेत, तेही काही अंतरावर.

ठाणे नवी मुंबई आणि मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगर यांच्याशी घोडबंदर रोड, एनएच ८, मुंबई-नाशिक महामार्ग आणि ठाणे-बेलापूर मार्गे कनेक्टिव्हिटी वाढवत आहे. ठाणेच्या भविष्यातील कनेक्टिव्हिटी प्लॅनमध्ये प्रस्तावित वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवाडावली मेट्रो रेल्वेचा समावेश आहे, ज्यामुळे ठाणे आणि वडाळा दरम्यान प्रवास कालावधी कमी होईल. ठाणे-दिवा रोड, भिवंडी बायपासवरील फ्लायओव्हर, कल्याण आणि मीरा-भाईंदर परिसरातील मेट्रो -3 प्रकल्प आणि मेट्रो मार्गावरील ठाणे ते कल्याण  समांतर रस्ते यांचे बांधकाम इतर पायाभूत सुविधांच्या विकासामध्ये समावेश करण्यात आले आहे. गेल्या एक वर्षामध्ये ठाणेच्या विविध भागामध्ये सुमारे ७% ते १०% दरांची सुधारणा झाल्याचे दिसून आले आहे, जो घर खरेदीदारांसाठी घर मालमत्ता खरेदीची किंमत बिंदू किफायतशीर बनवत आहे.

या क्षेत्रात आणखी एक मोठा आकर्षण म्हणजे २०-एकर ग्रँड सेंट्रल पार्क आहे, जे भारतातील सर्वात मोठ्या पार्क्सपैकी एक असण्याची अपेक्षा आहे. हे मालमत्तेच्या किमतींमध्ये वाढ करण्यासाठी एक प्रमुख घटक म्हणून कार्य करू शकते, विशेषतः त्याच्या आसपासच्या क्षेत्रात कारण हा ट्रेंड जगभरात पाहण्यात आलेला आहे. नाईट फ्रँकच्या द वेल्थ रिपोर्ट – इनसाइट सीरीज़ २०१९ नुसार, लंडनच्या रीजेंट्स पार्क आणि न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या जवळील घरांनी त्यांच्या शेजाऱ्यांच्या तुलनेत किंमतीमध्ये जवळजवळ एक तृतीयांश वाढ पाहिली आहे. सेंट्रल पार्क आणि रीजेंट्स पार्क सर्वोच्च प्रीमियमसाठी आघाडीवर आले, जे पार्क-फेसिंग प्रॉपर्टीजसाठी २९% अधिक मागतात.

@ गिरीश शाह 

विक्री कार्यकारी संचालक

नाइट फ्रँक इंडिया

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts