Kaizen | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

कायझन

कायझन

काय आहे हा कायझन ?
पडलात ना विचारात ….?
चला तर मग ,जाणून घेऊ या कुतूहल नवीन शब्दाचे …अर्थात “कायझन ” चे .
कायझन हि एक जपानी म्हण आहे .याचा अर्थ
Continuous Development म्हणजेच
‘निरंतर प्रगती ‘असा होतो .

kai =change
zen =Good

kai + zen = change for good .
change for better .
जगण्यासाठी सातत्याने करीत राहिलेल्या सुधारणा म्हणजे कायझन .
कायझन हि संकल्पना जापनीज संस्थांच्या
प्रगतीसाठी मासाकी इमाइ यांनी राबवली .
१९८५ मध्ये स्थापन झालेल्या या कायझन मुळे जपानचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले .या घवघवीत यशाच्या पाठीमागे मासाकी इमाइ यांचा खारीचा वाटा आहे .
मोठमोठ्या कंपन्या,इंडस्ट्रीज मध्ये कायझन प्रणाली वापरली जाते .झेन,होंडा,टोयोटा यांसारख्या अनेक जापनीज कंपन्या भारतात कायझन तत्वावर उभारी घेताना दिसतात .
कोणतीही कामगिरी ,कार्यक्षेत्र गाजवण्यासाठी
हि प्रणाली उपयुक्त ठरते .
कायझन प्रणालीने कोणत्याही समस्येच्या
मुळाशी जाऊन निवारण करता येते .
कायझन ची 5S methodology वापरल्यास
आपल्या व्यवसाय,उद्योगात चमत्कार
बघावयास मिळतो .
कायझन प्रणाली अंतर्गत 5S methodology चा अवलंब केला जातो .
( मूळ जपानी शब्दांसहित विवेचन केले आहे )

1)Seiri
कामाचे वेगवेगळे भाग करणे sorting
कामाची क्रमवारी किंवा सुव्यवस्था करणे .
वर्गीकरणाच्या या विशिष्ट पद्धतीमुळे निष्कारण गोंधळ उडत नाही .

२) Sito
सुसज्ज व्यवस्था किंवा मांडणी करणे
प्रत्येक वस्तूला ठराविक एक जागा
देणे .
यामुळे शोधाशोध करण्यात लागणारी शक्ती आणि वेळ यांची बचत होते .

३) Siso
जागेची उच्चतम स्वच्छता ठेवणे .
यामुळे चांगल्या सवयीचा वि कास
होतो .स्वतःमध्ये आणि कामामध्ये
सुधारणा होतात .
४) Seketso
वस्तूचा दर्जा आणि गुणवत्ता
सुधारणे .( To maintain high
standerdisation )

५) Shitsuke
स्वयं अनुशासन करणे .
( sustain )
प्रत्येक एम्प्लॉयी ला सुयोग्य प्रशिक्षण
देणे .जबाबदाऱ्या वाटणे इ .टीम वर्क
करणे, सामूहिक जबाबदारी चोख पार
पडणे ,नियमावली कटाक्षाने पाळणे .

वरील सर्व गोष्टी अमलात आणल्याने कामात प्रेम,आणि आपली मालकी तयार होते .कामाचा वेग आणि तत्परता वाढते . 5S मध्ये स्वतःचा आणि संस्थेचा उत्कर्ष सामावलेला आहे .
कायझन प्रणालीमुळे आपल्या आयुष्याचा ,प्रगतीचा आलेख १००% उंचावला जातो .

प्रत्यक्ष उद्योगात फायदे :
१. उत्पादन क्षमता वाढते .
२. मालाची गुणवत्ता सुधारते .
३. वस्तूची किंमत कमी होते .
४.कामाच्या ठिकाणी सुरक्षितता येते .
५. नैतिक मूल्यांची पायाभरणी होते .

खरे तर kaizen प्रणाली स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल घडवून आणते .
कामाचे सुयोग्य नियोजन,व्यवस्थापन आणि आराखडा तयार केल्यास स्वतःची आणि कंपनीची प्रगती निश्चित ठरलेली असते .
इथे ०% गुंतवणुकीवर प्रगतीच्या वाटा रुंदावतात .
आपणास जर जपान,अमेरिका,सिंगापूर,मलेशिया,चीन इ . देशांच्या पुढे जायचे असेल तर ‘ कायझन प्रणाली ‘चा अवलंब हिताचा ठरेल .
चला तर मग
आजपासून ….
स्वतःपासून…. एक संकल्प करूया …
kaizen in Siso
(siso म्हणजे स्वच्छता .)

@हर्षदा जोशी ,पुराणिक
लातूर

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts