इडियट्स अँड जिनियस

इडियट्स अँड जिनियस

या जगात मंदबुद्धी पासून ते प्रचंड बुद्धिमत्ता असलेली माणसे या जगात वावरत आहेत .
आपल्या आजूबाजूला अशी काही माणसे असतात कि ती एखाद्या कोणत्या तरी विषयात अतिशय निपुण असतात.परंतु इतर कोणतेही सोपे काम देखील करण्यास ते असमर्थ असतात.
ऑलिव्हर नावाच्या एका मेंदूवैज्ञानिकाने एका तेरा वर्षीय आंधळ्या मुलाच्या काही गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. हा टॉम आंधळा असून त्याने कोणतेही संगीताचे प्रशिक्षण घेतलेले नसताना पियानोवर फक्त ऐकून वाजवायला शिकला ,एवढेच नाही तो संगीताच्या एकाच वेळी तीन रचना ऐकवत असे.डाव्या हाताने एक आणि उजव्या हाताने एक वाजवत तोंडाने उत्तम स्वरात तो गाणे म्हणून समोरच्यांना तोंडात बोटे घालावयास लावत असे.
असे असले तरी या टॉमला दैनंदिन जीवनातील अनेक कामे इतरांच्या मदतीने करत असे ,स्वतःच्या बुटाची लेस त्याला बांधता येत नव्हती.

याचबरोबर अशी काही मुले आपल्या आजूबाजूला असतात कि वरून दिसण्यास मंद बुद्धीची दिसतील परंतु आकडेमोड,पाढे इतके भरभर करत कि सामान्य आणि बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या मुलांना देखील ते जमत नाही.
खरे तर या मुलांचा बुध्यांक ५० ते ७० पर्यंत असतो .पण तरी देखील ही मुले मोठमोठी वेळापत्रके ,मोजमापे अचूक सांगू शकतात.अशक्य वाटणारी अशी एखादी गोष्ट यांच्याकडून कशी साध्य होते ??
यांना नक्की म्हणायचं तरी काय ? जिनियस कि इडियट ?

बुद्धी म्हणजे काय ? अशा वेळी हा प्रश्न आपल्या डोक्याचा अक्षरशः भुगा करून टाकतो.वरील उदाहरणातील प्रत्येक मुलाचा बुध्यांक अतिशय कमी म्हणजेच ६० च्या आसपास होता ,अपवाद म्हणून एखादी गोष्ट सोडली तर त्यांना इतर साधे सोपे व्यवहार आणि दैनंदिन आयुष्य सुद्धा नीट जगू शकत नाहीत. यातील बहुतांशी मुले कुठल्या ना कुठल्या मनोविकाराने ग्रस्त असतात .
(उदा . ऑटीजम ,ADHD इ.)
मानसशास्त्राने सांगितल्याप्रमाणे ही मुले इडियट आहेत आणि यांना “इडियट सावॉ”
म्हणतात .

याच्या अगदी उलट साहित्यिक,शास्त्रज्ञ,तत्वज्ञ ,डॉक्टर्स, प्राध्यापक ,चित्रकार ,
संगीतकार इ. लोकं प्रचंड बुद्धिमान असतात.
यांचा IQ १५० च्या पुढे असतो .
याची उदाहरणे म्हंटले तर आईन्स्टाईन ,रामानुजन ,सॉक्रेटिस ,न्यूटन ,इ. देता येतील .हे लोक इडियट सावा सारखे एखाद्या गोष्टीत निपुण नसून कोणतीही नवीन गोष्ट चटकन शिकतात ,गणित ,विज्ञान ,संगीत कोणत्याही अवघड विषयात यांना प्रचंड आवड आणि गती असते . काहींना तर न शिकवता ,वाचून देखील अनेक गोष्टी सहज शिकतात.म्हणूनच या सर्वाना “जिनियस” म्हणतात .यांना निसर्गाने अचाट बुद्धिमत्ता गिफ्ट दिलेली असते म्हणूनच यांना आपण गिफटेड नेस असे संबोधतो .

असे सगळे असले तरी बुद्धी म्हणजे काय ? ती कशी निर्माण होते ? मेंदूचा आणि बुद्धीचा काय संबंध ? अशी अनेक कोडी संशोधकांना आज ही पडलेली आहेत ….!!

हर्षदा जोशी ,पुराणिक .

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts

error: Content is protected !!