How to Protect Women? | Aaplaa Vyaaspith news

Sunday, December 15, 2019

Select your Top Menu from wp menus
Breaking News

स्त्री सुरक्षा करावी कशी ?

स्त्री सुरक्षा करावी कशी ?

निर्भया ,कोपर्डी आणि आता हैद्राबाद मधील पशुवैद्यक प्रियांका हिचे सामूहिक बलात्कारानंतर जाळून टाकण्याचे अमानुष कृत्य चार नराधमांनी केले हे ऐकून हृदयात चर्र झाले ,पोटात गोळा आला …..
सर्वात आधी प्रश्न पडतो यात त्या अबला मुलीचा काय अपराध ??
हो ,अबलाचं…..,,
घरातून बाहेर पडल्यावर संरक्षण कोण देणार ??
अजून किती अबला अशा वासनांध नराधमाच्या हातून रक्तबंबाळ होणार आहेत कोण जाणे ??
रोजच वर्तमानपत्रात अशा कितीतरी घटना आपण रोज वाचतो ,आणि सोडून देतो ,परंतु त्या मुलीचा जीव गेला म्हणून आपल्याला जास्त त्रास होतो आहे का ?
असे घाणेरडे कृत्य करणाऱ्या राक्षसांना जोपर्यंत धिंड काढून मरेपर्यंत मारत नाहीत तोपर्यंत अशा दुर्घटनांना आळा बसणार नाही .
आज प्रत्येक आईबापाला आपल्या मुलीस बाहेर पाठवावे का याचा दहादा विचार करावा लागेल …
या सगळ्यात मुलगी बाहेर पडल्यावर घरी येईपर्यंत तिच्या सुरक्षेची हमी कोणी घ्यायची ?????
कोणते संरक्षण कवच घालून तिला पालकांनी शिक्षण ,नोकरीसाठी पाठवायचे ????
सरकारवर की कायद्यावर विश्वास ठेवायचा ??
समस्त देशातील लेकीच्या अब्रू संरक्षणासाठी कोणावर अवलंबून राहायचे ???
खरंच अतिशय तार्किक आणि मार्मिक प्रश्न आज पुन्हा एकदा देशासमोर उभा आहे ….
यासाठी आता कोणावर अवलंबून राहता येणार नाही …..
माझ्या प्रत्येक माता ,भगिनींसाठी आग्रहाचे आणि कळकळीचे आवाहन आहे की बाळा ,आता आपल्या पर्समध्ये लिपस्टिक आणि पावडर ठेवण्याचे दिवस संपले आहेत ,आता आपल्या पर्समध्ये लाल मिरचीची पूड ठेवावी लागणार आहे ते ही आठवणीने …..,,
कराटे तुला आलेच पाहिजे ,तुझी लाज तुलाच राखायची आहे ,
आज शाळेमध्ये सातवी ,आठवी आणि पुढील वर्गातील मुलींना स्वसंरक्षण कसे करावे ? तोंड वर करून बघणाऱ्या राक्षसांना सामोरे कसे जावे ??
याचे ट्रेनिंग प्रत्येक मुलीला आईने ,बहिणीने ,शिक्षकांनी दिलेच पाहिजे ,ही काळाची गरज आहे ….
वर्गात एखाद्या विषयाचा तास कमी झाला तरी चालेल परंतु मुलींना कराटे ,स्वसंरक्षणार्थ लढता आलेच पाहिजे याविषयीचे शिक्षण देणे गरजेचे ठरेल ….
कामाच्या ठिकाणी ,रस्त्यावर ,कोठेही अनोळखी पुरुषांची घाणेरडी नजर , स्पर्श याबद्दल जागरूकता, दृष्टी प्रत्येक स्त्रीकडे आली पाहिजे ….
बोलावयास लाज वाटते पण जन्मलेल्या मुलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंत प्रत्येक स्त्रीने स्वसंरक्षणार्थ एखादी जहाल वस्तू आपल्यासोबत ठेवली पाहिजे …..
बाजारात देखील आता प्रत्येक लेडीज पर्स बनवताना कॅमेरा लोड केला पाहिजे ,त्यामुळे आपली मुलगी आता कोठे आहे ,कोणत्या संकटात आहे ,बाहेर जाऊन काय करते आहे ? सारे काही या कॅमेऱ्यात पाहता येईल ….
काळ वेळ सांगून येणार नाही ,काळावर घाला घालण्यासाठी स्त्रीने लढा दिलाच पाहिजे …..
आणि लक्षात ठेवा हा लढा स्वतःचाच स्वतःशी आहे ….!!
या सगळ्या प्रकरणामध्ये पालकांना देखील असे सुचवावे वाटते की आजकालची मॉडर्न जीवनशैली नक्कीच सगळ्यांचे डोळे विस्फारते परंतु उद्या डोळ्यांतून पाणी येईल इतके तिच्या आहारी जाऊ नये …
स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक पालकांनी ,शिक्षकांनी आपल्या लेकींना
जरूर समजावून सांगावा ….
पाश्चात्यांचे अंधानुकरण करत तोकडे कपडे नक्कीच घालावेत परंतु त्यांचे कायदे जेवढे कडक आहेत ते आपल्याकडे आल्यानंतरच ……..!!!
स्वरक्षा …
सुरक्षा …..
स्वतःपासूनच …..
चला तर मग आज आपण प्रत्येक लेकींपर्यंत एक प्रतिज्ञा पोहोचवू ……
“मी माझी सुरक्षा स्वतःच करणार आहे .”
स्त्री केवळ सौंदर्यवती नव्हे तर तीच शक्तीची मूर्ती आहे …
तूच महिषासुरमर्दिनी ….
तूच चंडिका …
तूच महाकाली हो ….
सीता माता होऊन राहण्यात हे काही सत्ययुग नाही ,
समस्त स्त्री वर्गाला आपला अवतार आता बदलावा लागणार आहे ….
आजच्या मुलींना अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यास शिकवू या …..
आपल्या लेकीच्या सुरक्षेसाठी आणखी काही साध्या सोप्या यंत्रणा असतील तर कंमेंट बॉक्स मध्ये नक्कीच पाठवा ,
प्रत्येक घरात ,घरातल्या प्रत्येक लेकीपर्यंत / स्त्रीपर्यंत आपण हा संदेश घेऊन जाऊ …..
आपत्काळामध्ये👈 कोणत्या गोष्टी कराव्यात ?
घाबरून न जाता पळ काढणे
शक्य तो ओरडून गाजावाजा करणे
आसपासच्या लोकांना जमा करणे .
आधी पायातली चप्पल ,दगड घेऊन मारणे
प्रसंगावधान राखत काय करता येईल ते पाहणे .
निर्जन ठिकाणी उशिरापर्यंत थांबू नये /एकटे थांबू नये .
ऑफिसमध्ये आपल्याव्यतिरिक्त कोणी आहे का नाही नेहमी खात्री करत राहणे .
निर्भया हेल्पलाईन नंबर कायम लक्षात ठेवणे .
कोणताही पुरुष विनाकारण आपल्याशी
बोलत असेल तर गाफील राहू नये .
पुरुषांशी बोलताना नजर चोरून नव्हे तर नजर भिडवून स्पष्ट ,रोखठोक बोलून त्यांच्या नजरेत ,मनात काय चालले आहे ते ओळखणे .
कोणीही कसलीही जवळीक अथवा अश्लील शब्दांचा प्रयोग केल्यास बापाने घेतलेल्या किमती सॅंडलचा वापर करा .
चार माणसात गाल लाल करण्याचे सामर्थ्य ठेवा .
संस्कारांबरोबर स्वसंरक्षण शिकविणे हि प्रत्येक पालकाची नैतिक जबाबदारी असणार आहे …..
समाजात वावरणाऱ्या विषारी सापाची नांगी ठेचलीच पाहिजे ….🔥

@ हर्षदा जोशी ,पुराणिक

छायाचित्र : गुगल images

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts