chitra charoli 395 | Aaplaa Vyaaspith news

Saturday, February 22, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३९५

चित्र चारोळी ३९५

शेताच्या बांधावर
राघू झाले गोळा
निसर्गरम्य असा
पहा विलोभनीय सोहळा
@ सौ शामल अविनाश कामत

—————————————————————–

कोवळे कोवळे उन पसरे साळी शेतावरी
निळ्या नभी निळ्या पर्वत रांगा दिसे दुरवरी
दुरवर तरुकिनार शोभे या सुपीक भूवरी
हितगूज करण्यात रमले रंगीत खग हे लाकडी काठीवरी!!
@ अनघा कुलकर्णी

———————————————————————

होईल भविष्याची तजबेज
चर्चा रंगली मित्राची
निसर्गाने साथ दिली
मौज झाली चिमुकल्याची
@ राधिका जाधव – अनपट

———————————————————————-

गिरीरांग विसावली नील नभाखाली
घनदाट तरू बहरले पर्वताच्या तळी
डवरूनी आली हरीत रोपे शेतातली
काष्टी बैसली नाजुक पाखरे पंचरंगी
@ मिलिंद कल्याणकर

——————————————————————–

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts