chitra charoli 367 | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३६७

चित्र चारोळी ३६७

हे स्वप्न म्हणू कि वास्तवता?
परमेश्वरा तुझी चराचरात कल्पकता.
जे आपणाकडे उदात्त ते इतरांना द्यावे,
निसर्गाच्या ह्या सलोख्याच्या धर्माचे आपणही धनी व्हावे…
@ ऊज्वला रवींद्र राहणे.
विक्रोळी

—————————————————————————

नयनरम्य दृश्य बोलके
पाण्यावरती उठती तरंग
पाहून मोहत झाला भ्रमर
फुलांचे विविध रंग
@ राधिका जाधव – अनपट

————————————————————————

आसमंत धवल नील रंगात उजळला
हरित तरूंवेलीने सारा परिसर नटला
संथ जळी शुभ्र कारंजे वाढवी शोभा
पुष्प साक्षीने तरूंची जलाशयी छाया
@ मिलिंद कल्याणकर

——————————————————————————

पांढरे शुभ्र मोकळे आकाश
हिरवीगार झाडी, निळसर जलाशय सोबतीला
लाल तांबडी फुले , पाने फुले टवटवीत
सुंदर असे वातावरण भोवतीला
@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई

———————————————————————–

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts