chitra charoli 366 | Aaplaa Vyaaspith news

Friday, January 17, 2020

Select your Top Menu from wp menus
Breaking News

चित्र चारोळी ३६६

चित्र चारोळी ३६६

हिरवाईने सजला गिरी तळी दाटी तृणाची
घवल उन्ही लाल कौलारू घरकुले वसली
निसर्गाचे मनमोहक दान महिरप सप्तरंगी
सुबक टुमदार घरटयांचे खेडे मनास मोही
@ मिलिंद कल्याणकर

—————————————————

डोंगराच्या पायथ्याशी
सुबक सुंदर कौलारू घर
इंद्रधनुष्याची देखणी कमान
नजर फिरते खालीवर
@ राधिका जाधव – अनपट

—————————————————–

श्रावणमासी उन पावसाचा खेळ चाले
कवळ्या उन्ही हरित सृष्टीने सांज खुले
वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी दिसे
तरू शिखरे,कौलारू घरावर पिवळे सोने पसरे।
@ अनघा कुलकर्णी

——————————————————

About The Author

Vyaaspith

प्रिंटमिडिया आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे मिश्रण म्हणजे वेबमिडिया म्हणूनच www.vyaaspith.com

Related posts