
झाडांतुनी पाझरली रविकिरणे भुवरी
मृदावाटेसह सुबक घरकुले उजळली
टुमदार कौलारू घर हिरवाई कोंदणी
घरट्यावरती छाया पर्णांसह फांदीची
@ मिलिंद कल्याणकर
————————————————————
अंधार दूर करूनी
सूर्योदय झाला
सोनसकाळ घेऊन
नविन दिवस उजाडला
@सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई
—————————————————————
कोलारू घराचं
सुंदर चित्र सजल..
निसर्ग संगतीत,
डोलाया लागलं..
@ गजानन पवार
—————————————————————-