
धरतीने नेसला हिरवा शालू
त्यात लाल फुंलाची उधळण
तिचे पाहून सुंदर मोहक रूप
आभाळाचा आला उर भरून
@ राधिका जाधव – अनपट
——————————————–
कृष्ण मेघांनी हे ,गगन भरता आषाढमासी
होई पर्युत्सुक तो चातक वाटपाही चार्तुरमासी
पखरण घाली भूवरी रक्तवर्णी सुमने सुगंधी
हरित शाल परिधान करूनी ,धरणी पसरी मृदसुगंधी धुंदी!
@ अनघा कुलकर्णी
——————————————————-
कृष्णवर्णी मेघ दाटले आसमंती
आभाळात मळभ आले भरूनी
धवल रविकिरण उतरले धरेवरी
हरित तरू तृणांत सुमने बहरली
@ मिलिंद कल्याणकर
——————————————————-
हिरवा शालू नेसून धरणी सजली
लाल फुले माळून सुंदर नटली
प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी
काळ्या मेघांनी दाटी केली
@ सौ शामल अविनाश कामत
वाशी नवी मुंबई
——————————————————